RBI Google
बिझनेस

Repo Rate: RBI चा सर्वसामान्यांना दिलासा! ५ वर्षात पहिल्यांदा रेपो रेटमध्ये कपात; EMI होणार कमी

Repo Rate Decreases: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. रेपो रेटमध्ये कपात केली आहे. पाच वर्षात रिझर्व्ह बँकेने पहिल्यांदा रेपो रेटमध्ये कपात केली आहे.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांवरील कर्जाचा हप्ता कमी होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तब्बल ५ वर्षांनी रेपो रेटमध्ये कपात केली होती. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. यामुळे रेपो रेट ६.२५ टक्के झाला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये २०२० मध्ये रेपो रेट कमी करण्यात आला होता. त्यानंतर आज पाच वर्षांनी रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो रेट वाढवण्यात आला होता. त्यानंतर आज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.(RBI Repo Rate)

पतधोरण बैठकीत आर्थिक विषयावर चर्चा झाली आहे. या बैठकीत सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता रेपो रेट ६.५० वरुन ६.२५ करण्यात आला आहे. यामुळे आता कर्जाचा ईएमआय कमी होणार आहे.

रेपो रेटवर आधारित कर्जाचे व्याजदर ठरवले जाते. रेपो रेटनुसार कर्जावर व्याजदर आकारले जाते. सर्व बँका रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट फॉलो करतात. त्यानंतरच व्याजदर ठरवतात. आता हा रेपो रेट कमी झाल्याने बँकांचे व्याजदरदेखील कमी होणार आहे. रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी कपात झाली आहे. त्यामुळे EMI देखील कमी झाला आहे. (RBI Repo Rate Decrease)

याबाबत आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, या आर्थिक वर्षात ४.७ टक्के महागाई राहण्याची शक्यता आहे. येत्या काळात ही महागाई अजून कमी होण्याची शक्यता आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून रेपो रेट कमी करण्याची मागणी केली जात होती. दरम्यान,रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. त्यानंतर आता रेपो रेट कमी करुन रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shefali Jariwala Property: शेफाली जरीवालाची एकूण संपत्ती किती? वारसदार कोण?

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

SCROLL FOR NEXT