शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी SAAM TV
बिझनेस

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, RBI कडून मोठी घोषणा, वाचा काय घेतला निर्णय?

RBI MPC meeting : शेतकऱ्यांसाठी आरबीआयने मोठा निर्णय घेतला आहे. विनातारण कर्जाची रक्कम वाढवण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे.

Namdeo Kumbhar

नवी दिल्ली : (Reserve Bank latest Anouncement) रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीचे निर्णय जाहीर केले. रेपो रेट आणि व्याज दर याचा थेट संबंध आहे.  रिझर्व बँकेने आज रेपो दरात कपात न केल्याने तुमचा तक्जाचा हप्ता म्हणजेच EMI आजही स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा झालेला नाही. मात्र, शेतकरी वर्गासाठी एक दिलासादायक बातमी आहे. रिझर्व बँकेने शेतकऱ्यांना एक भेट दिली असून त्याअंतर्गत शेतकऱ्यांसाठी तारणमुक्त कर्जाची मर्यादा वाढवली आहे.

शेतकऱ्यांसाठी रिझर्व बँकेने नेमकी काय घोषणा केली

रिझर्व बँकेच्या धोरणानुसार सध्या शेतकऱ्यांसाठी तारण मुक्त कर्जाची मर्यादा सध्याच्या 1.6 लाख रूपये आहे. ही मर्यादा 2 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा फायदा लहान व मध्यम शेतकऱ्यांना होणार आहे. या घोषणेचा स्पष्ट अर्थ असा आहे की आता शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कोणतेही तारण घ्यावे लागणार नाही. पूर्वी ही मर्यादा 1.60 लाख रुपये होती, म्हणजेच कोणतेही तारण न देता, शेतकरी केवळ 1.60 लाख रुपयांपर्यंतच कर्ज घेऊ शकत होते, ज्याची मर्यादा आता 2 लाख रुपये झाली आहे.

रिझर्व बँकेने कमी केला सीसीआर

चालू आर्थिक वर्षाच्या पाचव्या द्विमासिक पतधोरण आढाव्यात सलग 1 1व्यांदा, रिझर्व बँकेने शुक्रवारी पॉलिसी रेट रेपोमध्ये कोणताही बदल केला नाही आणि तो 6.5 टक्के ठेवला. मात्र, अर्थव्यवस्थेत रोख वाढवण्याच्या उद्देशाने मध्यवर्ती बँकेने सीआरआर (कॅश रिझर्व्ह रेशो) 4.5 टक्क्यांवरून चार टक्क्यांवर आणला. रिझर्व बँकेने उचललेल्या या पाऊलामुळे बँकांमध्ये 1.16 लाख कोटी रुपयांची अतिरिक्त रोकड येईल.

जीडीपीचा अंदाजही झाला कमी 

यासोबतच सध्याची परिस्थिती पाहता आरबीआयने चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपी म्हणजेच सकल देशांतर्गत उत्पन्न अंदाज 7.2 टक्क्यांवरून 6.6 टक्क्यांवर आणला आहे. ऑक्टोबर एमपीसीमध्ये, आरबीआयने देशाचा जीडीपी 7.2 टक्के वेगाने वाढण्याचा अंदाज व्यक्त केला होता. आरबीआयने चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाई दराचा अंदाज 4.5 टक्क्यांवरून 4.8 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

Edited By- नितीश गाडगे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

SCROLL FOR NEXT