RBI UPI Transaction Limit Exceeds  Saam Tv
बिझनेस

RBI ने UPI ट्रांजेक्शन लिमिटमध्ये केली वाढ, ५ लाख रुपयांपर्यंत करता येणार पेमेंट; नियमही लागू

कोमल दामुद्रे

RBI Monetary Policy :

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील UPI ट्रांजेक्शनला अधिक प्रोत्साहन देते. वाढत्या डिजिटलायझेशनच्या युगात हल्ली ऑनलाइन पेमेंटचा वापर युजर्समध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतं आहे.

परंतु, ऑनलाइन पेमेंट करताना युजर्सला UPI ट्रांजेक्शनसाठी लिमिट असते. त्यामुळे बरेचदा मोठे व्यवहार करताना नाकी नऊ येतात. अशातच RBI ने हॉस्पिटल आणि शाळेच्या UPI ट्रांजेक्शन लिमिटमध्ये वाढ केली आहे. सध्या दरमहिन्याला UPI च्या व्यवहारांमध्ये वाढ होताना दिसून येतं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अशातच RBI ने ऑफलाइन (Offline) व्यवहारांसाठी UPI मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)वापरण्यास प्रोत्साहन दिले आहे. शुक्रवारी झालेल्या पतधोरणाच्या बैठकीत आरबीआयचे गर्व्हनर शक्ती कांत दास यांनी सांगितले की, रेपो दरात कोणताही बदल केला जात नाहीये. हॉस्पिटल आणि शाळांच्या UPI च्या व्यवहाराची मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणाही त्यांनी केली.

1. अधिक पैसे भरण्यास सक्षम

RBI च्या नव्या निर्णयानंतर आता UPI च्या मदतीने हॉस्पिटल (Hospital) आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जास्त पेमेंट करता येणार आहे. नवीन धोरणानुसार आता १ लाख रुपयांऐवजी ५ लाख रुपयांपर्यंत UPI द्वारे पेमेंट करता येणार आहे. या निर्णयामुळे संस्थांमध्ये यूपीआयच्या वापराला चालना मिळणार आहे. यामुळे रुग्णालयाचे बिल आणि शाळा-कॉलेजची फी भरताना होणारी गैरसोय कमी होईल.

2. कर्जावर सवलत मिळणार नाही

RBI ने पतधोरणात रेपो दर आणि इतर धोरणात्मक दरांमध्ये कोणतेही बदल केलेले नाही. तसेच कर्जाच्या EMI वर कोणताही दिलासा मिळणार नाहीये. रेपो दरात कोणताही बदल न झाल्यामुळे बँकांना त्याच दरात कर्ज मिळणार आहे.

NPCI नुसार, तुम्ही 1 लाख रुपयांपर्यंत पाठवू शकाल. पेटीएम एका तासात 20,000 रुपयांपर्यंत व्यवहार करु शकते. दर तासाला किमान 5 व्यवहार आणि जास्तीत जास्त 20 व्यवहारांना परवानगी आहे. PhonePe वापरकर्त्यांना एका दिवसात 1 लाख रुपयांपर्यंत व्यवहार करण्याची परवानगी देते. त्यामुळे व्यवहार करताना या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT