RBI Saam Tv
बिझनेस

RBI Jobs: कोणतीही परीक्षा नाही थेट RBI मध्ये नोकरी; मिळणार भरघोस पगार; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

RBI Job Vacancy: रिझर्व्ह बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रिझर्व्ह बँकेत सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. कोणत्याही परीक्षेशिवाय ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी

कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी

अर्जप्रक्रिया जाणून घ्या

रिझर्व्ह बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. रिझर्व्ह बँकेत कोणत्याही परीक्षेशिवाय नोकरी मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेने लेटरल रिक्रूटमेंटसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. या नोकरीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.

रिझर्व्ह बँकेत डेटा सायन्स, डेटा इंजिनियर, आयटी सिक्युरिटी एक्सपोर्ट, आयटी सायबर सिक्युरिटी अॅनालिस्ट, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर, प्रोजेक्ट मॅनेजर, रिस्क अकाउंट, डेटा इंजिनियर, क्रेडिट रिस्क स्पेशलिस्ट या क्षेत्रात भरती जाहीर करण्यात आली आहे. या क्षेत्रात शिक्षण झालेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे.

रिझर्व्ह बँकेतील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १७ डिसेंबर २०२५ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करायचे आहेत.

रिझर्व्ह बँकेत एकूण ९३ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. लेटरल रिक्रुटमेंट म्हणजे एक्सपोर्ट किंवा अनुभवी प्रोफेशनलची नोकरीसाठी थेट नियुक्ती केली जाईल. ग्रेड सी पदांसाठी ही भरती असणार आहे.

पात्रता

रिझर्व्ह बँकेतील या नोकरीसाठी पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे. डेटा सायंटिस्ट पदासाठी स्टॅटिस्टिक्स/इकोनॉमिक्स/मैथ/डाटा साइंस/फाइनेंस/इकोनॉमिक्स में मास्टर्स डिग्री किंवा बी.ई/बीटेक कॉम्प्युटर सायन्स पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत ४ वर्षांचा अनुभव असावा. डेटा इंजिनियर पदासाठी बी.ई /बीएससी/एमएससी/ एमटेक कंप्यूटर साइंस/इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी/इलेक्ट्रिकल एंड इलेक्ट्रॉनिक्स किंवा एमसीए पदवी प्राप्त केलेली असावी.

रिझर्व्ह बँकेतील या नोकरीसाठी किमान वयोमर्यादा २५ ते ४० वर्षे आणि कमाल वयोमर्यादा ४० ते ६० वर्षे असावी. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड प्रायमरी स्क्रिनिंग, शॉर्टलिस्टिंग, कागदपत्र पडताळणी आणि इंटरव्हयूनंतर फायनल सिलेक्शन केले जाईल. ही भरती फुल टाईम कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT