RBI On Rs 500 Note  SAAM TV
बिझनेस

Rs 500 Note with Star Symbol : स्टार चिन्ह असलेली 500 रुपयांची नोट खरी की खोटी? सोशल मीडियावरील अफवेनंतर RBI ने दिलं स्पष्टीकरण

Rs 500 Note : स्टार चिन्ह असलेल्या काही नोटा चलनात आल्या आहेत. या नोटा बनावट असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत.

Nandkumar Joshi

RBI clarifies Rs 500 Note with Star Symbol : ५०० रुपयांच्या नोटांसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. स्टार चिन्ह असलेल्या काही नोटा चलनात आल्या आहेत. या नोटा बनावट असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. आरबीआयनं त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. या नोटा खऱ्या आहेत. सोशल मीडियावर करण्यात येत असल्याचा दावा चुकीचा आहे, असेही आरबीआयने स्पष्ट केलं.

सरकारने (Government) २००० रुपये मूल्याच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर ५०० रुपयांच्या नोटांसदर्भात नागरिकांमध्ये वेगवेगळी चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, स्टार चिन्ह असलेल्या नोटा चलनात आल्यानंतर नागरिकांमध्ये संभ्रम आहे. मात्र, आरबीआयने हा संभ्रम दूर केला आहे.

स्टार चिन्ह असलेल्या नोटा खऱ्या

रिझर्व्ह बँकेने (RBI) ५०० रुपयांच्या नोटांबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. स्टार (*) चिन्ह असलेल्या नोटा या खऱ्या आहेत. १० रुपये मूल्यापासून ५०० रुपये मूल्यापर्यंतच्या अनेक नोटा चलनात आहेत. त्यावर सीरिजमध्ये तीन अक्षरांच्या नंतर स्टार चिन्ह आहे. त्यानंतर क्रमांक लिहिले आहेत, असे आरबीआयने म्हटले आहे. क्रमांकांमध्ये असलेले स्टार चिन्ह म्हणजे ती बदललेली किंवा रिप्रिंट म्हणजेच पुन्हा छपाई केलेली नोट आहे. ही नोट खरी आहे, असे आरबीआयने सांगितले.

स्टार चिन्ह असलेल्या नोटा आधीपासूनच चलनात

आरबीआयने सांगितले की, स्टार चिन्ह असलेल्या नोटा सन २००६ पासूनच चलनात आहेत. या चलनी नोटा २००६ पासून उपलब्ध आहेत. सुरुवातीला स्टार चिन्ह असलेल्या १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांची छपाई करण्यात येत होती. आता मोठ्या मूल्याच्या नोटाही छापल्या जात आहेत. जेव्हा अशा प्रकारच्या चलनी नोटा जारी केल्या जातात, त्यावेळी पाकीटावर एक पट्टी लावली जाते. त्यावर पाकीटात स्टार चिन्ह असलेल्या नोटा आहेत, असे नमूद केले जाते.

स्टार चिन्ह असलेल्या नोटा रिप्रिंट

स्टार चिन्ह असलेल्या चलनी नोटांना छपाईदरम्यान खराब झालेल्या नोटांच्या बदल्यात जारी केल्या जातात. अशा स्टार चिन्ह असलेल्या नोटा रिप्रिंट केल्या जातात. त्यामुळे जर तुमच्याकडे स्टार सीरिजच्या नोटा आल्या, तर घाबरू नका. या नोटा खऱ्या आहेत, असे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistani Celebrities: फवाद, माहिरा ते शाहिद आफ्रिदी...; भारताने २४ तासांत पुन्हा पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडियावर घातली बंदी

Tulja Bhawani Mandir : तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकणे भोवले; ८ पुजाऱ्यांवर मंदिर प्रवेश बंदी, तुळजाभवानी मंदिर प्रशासनाची कारवाई

Anand Dighe Video : एकदम साधेपणा, पण नजरेत करारी बाणा; आनंद दिघेंचा २७ वर्षांपूर्वीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Maharashtra Live News Update: मामा राजवाडे यांची महानगर प्रमुख पदावरून हकालपट्टी

Varanasi Crime News : धक्कादायक! नोकरी दिली नाही म्हणून संतापला, मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT