RBI New Loan Recovery Rules 2027 Saam Tv
बिझनेस

RBI : EMI वेळेवर भरता आला नाहीतर फोन लॉक होणार नाही, RBI कडून स्पष्टीकरण

RBI Loan Recovery New Rules Update News : EMI थकली म्हणून बँक किंवा फायनान्स कंपनी मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉप लॉक करू शकणार नाही. RBIच्या नव्या कर्जवसुली नियमांबद्दल जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • RBI ने लोन रिकव्हरीचे नियम बदलले

  • १ जानेवारी २०२७पासून EMI थकली म्हणून केवळ रिकव्हरीसाठी मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉप लॉक किंवा डिसेबल करता येणार नाही

  • डिव्हाइस खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाच्या बाबतीत काही अटींसह काही सुविधा मर्यादित

RBI New Loan Recovery Rules 2027 पर्सनल लोन, होम लोन किंवा कार लोन घेतल्यानंतर काही कारणांमुळे EMI वेळेवर भरता आली नाही, तर कर्जदारांना रिकव्हरी एजंटांकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी अनेकदा समोर येतात. काही प्रकरणांमध्ये ग्राहकांवर दबाव आणण्यासाठी त्यांच्या मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉपला लॉक किंवा ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, आता अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) महत्त्वाचे नियम स्पष्ट केले आहेत.

RBI च्या नवीन नियमांनुसार, एखाद्या व्यक्तीने कर्जाचे EMI थकल्यामुळे केवळ रिकव्हरीसाठी बँक किंवा फायनान्स कंपनी ग्राहकाचा मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉप लॉक अथवा डिसेबल करू शकणार नाही. हे नियम १ जानेवारी २०२७ पासून लागू होणार आहेत. RBIला रिकव्हरी एजंटांकडून ग्राहकांना धमकावणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून दबाव आणणे आणि अश्लील भाषा वापरण्याबाबत अनेक तक्रारी मिळाल्या होत्या. त्यानंतर कर्जवसुलीशी संबंधित नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.

मात्र, एखाद्या ग्राहकाने मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉप खरेदी करण्यासाठीच कर्ज घेतले असेल, तर काही अटींसह त्या डिव्हाइसच्या काही सुविधा मर्यादित करण्याची परवानगी असू शकते. तरीही सुरुवातीपासून संपूर्ण डिव्हाइस बंद करता येणार नाही. तसेच इनकमिंग कॉल, SMS आणि इमर्जन्सी SOS सारख्या आवश्यक सुविधा सुरू ठेवाव्या लागतील.

याशिवाय, डिव्हाइस लॉक करण्यासाठी वापरली जाणारी टेक्नॉलॉजी सुरक्षित असणे आवश्यक असेल. रिकव्हरी एजंटांनाही ग्राहकांची केवळ आवश्यक तेवढीच वैयक्तिक माहिती देण्याचे निर्देश RBIने दिले आहेत. या नव्या नियमांमुळे कर्जवसुली प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यासोबतच ग्राहकांच्या गोपनीयतेलाही अधिक संरक्षण मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT