RBI Cheque Book Rules AI Image
बिझनेस

RBI Bank : १ जानेवारीपासून चेकबुकचे नियम बदलणार, नेमकं काय आहे सत्य?

RBI Bank Update News : 1 जानेवारी 2027 पासून चेकबुकचे नवे नियम लागू होणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, RBI ने हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे. जाणून घ्या संपूर्ण सत्य.

Alisha Khedekar

  • सोशल मीडियावर 1 जानेवारी 2027 पासून चेकबुकचे नवे नियम लागू होणार असल्याचा मेसेज व्हायरल .

  • व्हायरल नोटीसमध्ये 'RBI New Cheque Book Rule From 1 Jan 2027' असा दावा

  • RBI ने हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले

सोशल मीडियावर सध्या बँकेच्या चेकबुकबाबत एक पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये 1 जानेवारी 2027 पासून चेकबुकसंदर्भात नवा नियम लागू होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) स्पष्ट केले आहे. त्यामुळे बँक ग्राहकांनी या व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आरबीआयने केले आहे.

नेमका काय आहे व्हायरल मेसेज?

सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या एका नोटीसमध्ये 'RBI New Cheque Book Rule From 1 Jan 2027' असे लिहिले आहे. म्हणजेच 1 जानेवारी 2027 पासून चेकबुकचा नवा नियम लागू होणार असल्याचा दावा या पोस्टमधून केला जात आहे. अनेक लोक कोणतीही खात्री न करता ही पोस्ट पुढे शेअर करत आहेत.

RBI ने काय दिले स्पष्टीकरण?

या व्हायरल पोस्टची दखल घेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 7 नोव्हेंबर रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये आरबीआयने व्हायरल होत असलेल्या नोटीसचा फोटोही जोडला आहे. मात्र, या फोटोवर मोठ्या अक्षरात 'FAKE' असे लिहिले आहे. आरबीआयने स्पष्ट केले की, चेकबुकच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच 1 जानेवारी 2027 पासून कोणताही नवीन चेकबुक नियम लागू होणार नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही माहिती दिशाभूल करणारी आहे.

बँक ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?

आजकाल सोशल मीडियावर बनावट सरकारी नोटिसा आणि खोट्या बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अनेकदा लोक अशा पोस्टची सत्यता तपासल्याशिवाय त्या पुढे पाठवतात. त्यामुळे इतर लोकांमध्येही गैरसमज निर्माण होतो. त्यामुळे बँकेशी किंवा सरकारी नियमांशी संबंधित कोणतीही माहिती मिळाल्यास तिची खात्री अधिकृत वेबसाइट किंवा सोशल मीडिया अकाउंटवरून करून घ्या. कोणतीही माहिती खरी असल्याची खात्री होईपर्यंत ती पुढे शेअर करू नका, असे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेच्या नेत्यांची मीनाक्षी शिंदेंच्या दिवाळी पहाटकडे पाठ

Diwali Diya Vastu Tips: दिवाळीच्या रात्री घराच्या दरवाजावर दिवा का लावला जातो? जाणून घ्या खास धार्मिक महत्त्व

Veg Kurma Recipe: दिवाळीला घरच्या घरी बनवा हॉटेलस्टाईल टेस्टी व्हेज कुर्मा, वाचा खास रेसिपी

LPG Cylinder : दिवाळीच्या दिवशीच गॅस संपला? टेन्शन सोडा! इंडेनने दिले २ भन्नाट पर्याय

Sonia Gandhi : आणीबाणीचा निर्णय चुकीचा होता, सोनिया गांधींच्या त्या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या

SCROLL FOR NEXT