Ration Card KYC Saam Tv
बिझनेस

Ration Card KYC: मोठी बातमी! महाराष्ट्रातील तब्बल १,५०,००० रेशन कॉर्ड बंद, मिळणार नाही धान्य; तुमचंही नाव आहे का?

Ration Card KYC Stop: रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता ज्या लाभार्थ्यांनी रेशन कार्ड केवायसी केले नाही त्यांचा लाभ बंद होणार आहे.

Siddhi Hande

रेशनकार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता रेशन कार्डची केवायसी करण्याची अंतिम तारीख उलटून गेली आहे. आता तुम्हाला केवायसी करता येणार नाहीये. दरम्यान, ज्यांनी केवायसी केले नाही त्यांना आता अन्नधान्याचा लाभदेखील घेता येणार नाही. यासाठी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने पाऊलदेखील उचलले आहे.

राज्यातील दीड कोटी लाभार्थ्यांचा लाभ बंद

रेशन कार्ड केवायसी करण्याची मुदत संपली आहे. अनेक रेशन कार्डधारकांनी केवायसी केले परंतु अनेकांनी अजून केले नाही. त्यामुळे त्यांना आता धान्य मिळणार नाहीये. यापुढे केवायसी करण्याची मुदतदेखील वाढवून देण्यात आलेली नाही. त्यामुळे केवायसी न करण्याचा फटका लाखो नागरिकांना बसला आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत केवायसीची मुदत संपल्यामुळे दीड लाभ लाभार्थी नोंदणी करु शकले नाही. त्यामुळे त्यांना आता धान्याचा लाभ मिळणार आहे.केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत महिन्याकाठी कोट्यवधी गरीब नागरिकांना धान्य वितरित केले जाते. प्रत्येक लाभार्थ्याला केवायसी करणे अनिवार्य आहे.

केवायसी न केल्यास काय होणार?

केंद्र सरकारसह राज्य सरकारने नागरिकांना रेशन कार्ड केवायसी करण्याचे आवाहन केले होते. यासाठी अनेकदा मुदतवाढदेखील देण्यात आली होती. त्यानंतर अनेकांनी केवायसी केले परंतु अनेकांचे केवायसी करणे अजून बाकी आहे. जर तुम्ही केवायसी केले नसेल तर तुम्हाला चांगलाच फटका बसणार आहे. या लाभार्थ्यांचे नाव रेशन कार्डमधून वगळले जाणार आहे. याचसोबत त्यांना आता धान्यदेखील मिळणार नाहीये. त्यामुळे भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: २०२६ की २०२७; कधी होणार आठवा वेतन आयोग लागू? केंद्र सरकारने स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी पंपासमोर ३ ते ४ किलोमीटरच्या रांगा

Mumbai : डोकं रिक्षावर आपटलं, फरफडत नेलं; ४ वर्षांच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण, वसईचा व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल!

भोंदू बाबा अशोक खरातवर शिर्डीत गुन्हा दाखल; 4 एकर भूखंड बळकावला|VIDEO

Dhurandhar 2 Collection : जगभरात 'धुरंधर 2'चा धुमाकूळ; 1,400 कोटींच्या उंबरठ्यावर, रणवीर सिंहने रचला इतिहास

SCROLL FOR NEXT