Ration Card Update saam tv
बिझनेस

Ration Card Update: तुमचे रेशन कार्ड सुरू आहे की बंद, कसं तपासाल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Ration Card EKYC : रेशन कार्ड सक्रिय आहे की नाही , तपासण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या याचे स्टेटस तपासू शकता.

Sakshi Sunil Jadhav

रेशन दुकानात धान्य घेण्यासाठी जाण्याआधी तुमचं रेशन कार्ड सक्रिय आहे की नाही, हे तपासून घेणं महत्त्वाचं आहे. रेशन कार्ड निष्क्रिय असल्यावर किंवा कुटुंबातल्या एखाद्या सदस्याची ई-केवायसी अपूर्ण असेल तर धान्य मिळवताना अडचणी येऊ शकतात. पण यासाठी प्रत्येक वेळी रेशन दुकानात जाण्याची गरज नाही. मोबाईलवर असलेल्या अधिकृत डिजिटल सेवांच्या मदतीने रेशन कार्डाची माहिती तपासता येते. त्यासाठी कोणती प्रोसेस करावी, जाणून घ्या.

रेशन कार्ड बंद होण्यामागे कोणती कारणे?

रेशन कार्ड किंवा त्यावरच्या सदस्यांची नोंद निष्क्रिय होण्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो.

दीर्घकाळ धान्य न घेणं - काही प्रकरणांमध्ये सलग सहा महिने रेशन न घेतल्याने पडताळणी होऊ शकतं. पण फक्त धान्य घेतलं नाही त्यामुळे प्रत्येक कार्ड आपोआप बंद होतंच असं नाही.

ई-केवायसी अपूर्ण असणं - कुटुंबातल्या सदस्यांची ओळख पडताळणी पूर्ण नसेल तर संबंधित नोंदी अपडेट करण्याची गरज भासू शकते.

आधार सीडिंगची समस्या - आधार क्रमांक रेशन कार्डशी जोडलेला नसेल तर किंवा पडताळणीत अडचण आल्यावर लाभ मिळण्यात अडथळे येऊ शकतात.

दुबार नोंद - एकाच व्यक्तीचं नाव दोन रेशन कार्डांवर असल्यास संबंधित नोंदींची पडताळणी केली जाऊ शकते.

मोबाईलवर रेशन कार्डाचे स्टेटस तपासण्याची प्रोसेस

रेशन कार्डाची माहिती तपासण्यासाठी पुढच्या स्टेप्स फॉलो करता येऊ शकतात.

१. सर्वप्रथम मोबाईलमध्ये केंद्र सरकारचे अधिकृत UMANG ॲप उघडा.

२.ॲपमध्ये लॉगिन करून सर्च बारमध्ये ‘Mera Ration’ किंवा ‘PDS’ हा पर्याय शोधा.

३. उपलब्ध सेवांमध्ये महाराष्ट्र राज्य निवडा.

४. रेशन कार्डचे तपशील पाहण्याचा पर्याय उपलब्ध असल्यास आवश्यक माहिती भरा.

५. कार्ड आणि कुटुंबातील सदस्यांशी संबंधित उपलब्ध नोंदी तपासा.

आधार सीडिंग आणि ई-केवायसी कशी पूर्ण कराल?

रेशन कार्डावरच्या एखाद्या सदस्याचे आधार सीडिंग किंवा ई-केवायसी अपूर्ण असेल तर संबंधित रास्त भाव दुकानात संपर्क साधा. आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन जा. अशा सुविधेनुसार -पॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक पडताळणी किंवा इतर निर्धारित प्रोसेसच्या मदतीने ई-केवायसी पूर्ण करता येते. पडताळणी झाल्यावर नोंदी अपडेट व्हायला वेळ लागू शकतो. प्रोसेस पू्र्ण झाल्यावर संबंधिक सदस्याची स्थिती परत तपासा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Parishad Election Result Live: नागपूर पदवीधर मतदारसंघात विजयाचा विश्वास; नितेश कराळे मास्तरांचा दावा

Ladki Vidhyarthini Yojana: लाडक्या बहिणीनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना सुरू, विद्यार्थिनींना वर्षाला मिळणार ६००० रुपये

Maharashtra News Live Update: तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात एमएसएफ सेक्युरिटी गार्डची दादागिरी

Vastu Tips: फ्रिजच्या वर चुकूनही ठेवू नका 'या' वस्तू; घरात सुख-समृद्धी टिकवण्यासाठी वास्तूचे हे नियम नक्की पाळा

8 Glasses of Water: खरंच दिवसाला ८ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे का? जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT