Ratan Tata Saam Tv
बिझनेस

Ratan Tata Birthday: भारतातील सर्वात 'दानशूर' उद्योगपती; रतन टाटा यांच्या संपत्तीचा आकडा वाचून डोळे दिपतील, जाणून घ्या

Ratan Tata Birthday: उद्योगपती रतन टाटा यांनी देशातील अनेक स्टार्टअप्सला पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. उद्याोगपती रतन टाटा यांनी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून सढळ हाताने मदत केली आहे.

Vishal Gangurde

Ratan Tata 86th Birthday:

टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचा आज गुरुवारी २८ डिसेंबर रोजी ८६ वा वाढदिवस आहे. रतन टाटा यांचे नाव जगभरात उद्योगाशिवाय सामाजिक कार्य आणि देशप्रेमासाठी ओळखलं जातं. टाटा यांनी देशातील अनेक स्टार्टअप्सला पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रतन टाटा यांनी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून सढळ हाताने मदत केली आहे. (Latest Marathi News)

रतन टाटा यांचं शिक्षण किती झालंय?

रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचं नाव नवल टाटा होतं. त्यांच्या आईचं नाव सुन्नु टाटा होतं. त्यांनी मुंबईच्या चॅम्पियन शाळेत इयत्त ८ वी पर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर मुंबईच्या कॅथेड्रल आणि जॉन कॉनोन शाळेत शिक्षण घेतलं.तसेच शिमला येथील बिशप कॉट्टन शाळेतही शिक्षण घेतलं आहे. १९५५ साली त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं.

टाटा यांनी पुढे अमेरिकेतील कॉरनेल विद्यापीठात आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल इंजीनियरिंगची पदवी प्राप्त केली. १९७५ साली हॉवर्ड बिझनेस स्कूलमध्ये मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केलं.

रतन टाटा यांचं करियर

१९६२ साली रतन टाटा यांनी 'टाटा स्टील'पासून करियरला सुरुवात केली. पुढे नऊ वर्षानंतर नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचं डायरेक्टर करण्यात आलं. १९७७ साली टाटा समूह कंपनीची इंप्रेस मिल्स देखील होती. मात्र, काही वर्षांनी मिल बंद पडली. पुढे १९९२ साली जेआरडी टाटा यांनी रतन टाटा यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रतन टाटा यांनी उद्योगक्षेत्रात चांगलं नाव कमावलं. २००८ साली रतन टाटा यांनी मध्यमवर्गीय कुटुंबासाठी नॅनो कार देखील लाँच केली होती.

रतन टाटा यांनी विमान सेवेतही खर्च केले आहे. मात्र, त्यांना फारसं यश आलं नाही. एयर इंडिया ही विमान सेवा देणारी कंपनी रतन टाटा यांची होती. या कंपनीचा डायरेक्टर असताना कंपनीला ४० टक्के फायदा झाला होता. नफ्यातही ५० टक्क्यांनी वाढ झाली होती. रतन टाटा हे चेअरमॅन पदावर विराजमान झाल्यानवर त्यांना ४० टक्के फायदा झाला.

'दानशूर' उद्योगपती

रतन टाटा हे दानशूर उद्योगपतीपैकी एक आहे. त्यांनी ६५ टक्के शेअर्स चॅरिटेबल ट्रस्टमध्ये गुंतवणूक केले आहेत. भारतातील अनेक विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप फंड अंतर्गंत मदत केली आहे. आयआयटी मुंबईलाही ९५ कोटी दान केले आहेत. रतन टाटा हे २६ नोव्हेंबर २००८ साली दहशतवाद्यांनी हल्ला केला , त्यावेळी रतन टाटा यांनी मृत आणि जखमी हॉटेल कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले होते.

रतन टाटा यांचं नेटवर्थ

रतन टाटा यांचं नेटवर्थ जवळपास ३५०० कोटी रुपये आहे. एका संकेतस्थानुसार, त्यांचं देशातील श्रीमंताच्या यादीत ४३३ वे स्थान आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा

Maharashtra News Live Updates: सोलापुरात महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत, उद्धव ठाकरेंचा सभांच्या तारखा ठरल्या

IND vs NZ 3rd Test,Day 2: न्यूझीलंड पराभवाच्या उंबरठ्यावर! टीम इंडिया अडीच दिवसांत सामना जिंकणार?

Maharashtra Politics: गोपाळ शेट्टी पक्ष हिताचे निर्णय घेतील, देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Maharashtra Politics :...म्हणून एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला; माहीम विधानसभा मतदारसंघाबाबत सदा सरवणकरांचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT