Anuprati Yojana Saam Tv
बिझनेस

Anuprati Yojana : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारकडून लाख रुपयांची मदत, नेमकी योजना आहे तरी काय?

Anuprati Yojana For Students: केंद्र सरकारसोबतच राज्य सरकार नागरिकांसाठी अनेक योजना राबवतात. विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे अनुप्रति योजना.

Siddhi Hande

केंद्र सरकारद्वारे देशभरातली नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. केंद्र सरकारसोबत अनेक राज्य सरकारदेखील अनेक योजना राबवतात. विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या योजना राबवण्यात येतात.

केंद्र सरकारच्या काही योजना या महिलांसाठी, उद्योजकांसाठी तर काही विद्यार्थ्यांसाठी असतात. अशीच एक योजना विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आली आहे. अनुप्रति योजना ही देशातील विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आली आहे. (Anuprati Yojana)

देशातील अनेक विद्यार्थी गरीब आहेत. त्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते.राजस्थान सरकारची ही योजना आहे. देवनारायण योजनेअंतर्गत ही अनुप्रति योजना राबवण्यात आली आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना १ लाख रुपयांपर्यंत मदत मिळते.

राजस्थान सरकारच्या अनुप्रति योजनेअंतर्गत आयएएस परीक्षा पास करणाऱ्या विद्यार्थ्यांना १ लाख रुपये दिले जातात. तसेच आरएएस परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ५०,००० रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, जमाती आणि विशेष प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लाभ मिळतो. ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. (Anuprati Yojana For Students)

या योजनेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराने स्पर्धा परीक्षा पास झाल्यानंतर ३ महिन्यात आवश्यक कागदपत्र जमा करु शकतात.या योजनेत विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. (What Is Anuprati Yojana)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन

LPG Gas Booking : सिलेंडरच्या बुकिंगचा मेसेज आलाय, पण DAC कोड खरा आहे की खोटा? कसं ओळखाल?

अनैतिक संबंधातून वहिनीला संपवलं, नंतर नेपाळमध्ये पलायन करण्याचं ठरवलं अन् कल्याण पोलिसांचा झारखंडमध्ये अटकेचा थरार

कल्याणमध्ये 5 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार

सत्ताधारी महिला आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; भररस्त्यात गाडी अडवत केली जातीवाचक शिवीगाळ, सुरक्षा रक्षकांना मारलं

SCROLL FOR NEXT