Railway Ticket Price 
बिझनेस

Railway Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर; तिकीट दरात ५० टक्के सूट मिळण्याची शक्यता

Railway Ticket Price: भारतातील लोक रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात. दररोज मोठ्या संख्येने प्रवाशी रेल्वे प्रवास करतात. दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या देशाचं आर्थिक बजेट मांडणार आहेत.

Bharat Jadhav

भारतात प्रवासासाठी रेल्वेमार्गाचा सर्वाधिक उपयोग केला जातो. देशातील मोठी लोकसंख्या प्रवासासाठी भारतीय रेल्वेवर अवलंबून आहे. ही बाब लक्षात ठेवत अर्थमंत्री निर्मला सीतारामन भारतीयांना एक खूशखबर देणार आहेत. देशाचा अर्थसंकल्प सादर करतांना रेल्वे प्रवास भाडेसंदर्भात मोठा निर्णय घेतला जाणार आहे.

या अर्थसंकल्पाकडून रेल्वे आणि रेल्वे प्रवाशांच्या स्वत:च्या अपेक्षा आहेत. कोविडच्या काळात रेल्वे रद्द केलेल्या सवलती पुन्हा दिल्या जातील अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना आहेत. कोरोना महामारीच्या काळात रेल्वेच्या भाड्यात वृद्धांना दिलेली सवलत पूर्णपणे रद्द करण्यात आली होती. केंद्राने ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात मोठी सूट दिली होती.

२०१९पर्यंत वयाच्या ६० वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ पुरुष प्रवाशांना रेल्वे प्रवास भाड्यात ४० टक्के सवलत देण्यात येत होती. तर वयाचे ५८ वर्ष पूर्ण करणाऱ्या महिला प्रवाशांना ५० टक्के सवलत देण्यात येत होती. परंतु कोविडच्या काळात ही सवलत पूर्णपणे रद्द करण्यात आली होते. ही सवलत पुन्हा आजपर्यंत सुरू झालेले नाही. त्यामुळे अर्थमंत्री या अर्थसंकल्पात रेल्वे प्रवास सुकर करण्यासाठी ही सवलत सुरू केली तर रेल्वे प्रवाशांना मोठी खूशखबर मिळेल. यामुळे तिसऱ्यांदा सत्तेवर आलेले मोदी सरकार पुन्हा ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे तिकिटात ५० टक्के सवलत जाहीर करतील, अशी अपेक्षा आहे.

नव्या रेल्वेंचं गिफ्ट

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन मेट्रो नेटवर्क, नमो भारत कॉरिडॉर, वंदे भारत ट्रेन्स, हाय स्पीड कॉरिडॉर आणि इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या विस्तारासाठी रेल्वे बजेटमध्ये निधी वाढवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. अर्थमंत्री रेल्वे भाड्यात काही बदल करतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे तिकीट दरात काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नव्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरबाबत अर्थसंकल्पात घोषणा अपेक्षित आहे. मोदी सरकार ३.० च्या पहिल्या बजेटमध्ये, भारतीय रेल्वे आधुनिक आणि हाय स्पीड असलेल्या २०० हून अधिक नवीन नॉन-एसी ट्रेन्सची घोषणा केली जाई शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT