Railway Recruitment Saam tv
बिझनेस

Railway Recruitment: खुशखबर! कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी; २८०१ पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

Railway Recruitment 2026: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. साउथ इस्टर्न रेल्वेत अप्रेंटिस पदांसाठी भरची जाहीर करण्यात आली आहे. २८०१ पदांसाठी भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

रेल्वेत नोकरीची संधी

१०वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी

२८०१ पदांसाठी होणार भरती

रेल्वेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. तुम्हालाही रेल्वेत नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. साउथ सेंट्रल रेल्वेत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. अप्रेंटिस पदासाठी ही भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी १०वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. साउथ सेंट्रल रेल्वेत एकूण २८०१ पदांसाठी भरती केली जाणार आहे. यामुळे हजारो तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे.

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ एप्रिल २०२६ आहे. इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करायचे आहेत.

रेल्वेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी १०वी पास असणे अनिवार्य आहे. याचसोबत त्यांनी आयटीआयमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. त्यांच्याकडे आयटीआय प्रमाणपत्र असावे. या नोकरीसाठी १५ ते २४ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.

कोणत्याही परीक्षेशिवाय होणार निवड

रेल्वेतील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय होणार आहे. उमेदवारांची निवड मेरिट लिस्टद्वारे होणार आहे. तुमचे १०वीतील आणि आयटीआयमधील गुणांच्या आधारे तुमची निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना १०० रुपये फी भरायची आहे.

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी तुम्हाला रेल्वेच्या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर तुम्हाला भरतीसंबंधित लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.

यानंतर महत्त्वाची माहिती आणि कागदपत्र अपलोड करा. यानंतर फॉर्म सबमिट करा.

फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात एकनाथ शिंदेंचं वजन वाढणार? ऑपरेशन टायगर यशस्वी, बक्षीस काय? राज्यात भाजपच्या गोटात अस्वस्थता?

School Timing: रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल; एकाच सत्रात भरणार शाळा

Maha TET: राज्यातील सव्वा २ लाखांहून अधिक शिक्षक देणार ‘TET’ परीक्षा; हॉलतिकीट येथून करा डाऊनलोड

मोठी बातमी! माजी मंत्र्याच्या मुलाला ED कडून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

खासदार फुटीमागे कॉन्ट्रॅक्टर कनेक्शन? 'मराठवाड्यातील कॉन्ट्रॅक्टरनं खरेदी केले खासदार'

SCROLL FOR NEXT