Punyashlok Ahilyadevi Holkar Scheme  meta ai
बिझनेस

Maharashtra Farm Loan Waiver 2026: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! हे काम पूर्ण केले नाही तर कर्जमाफी मिळणार नाही

Punyashlok Ahilyadevi Holkar Scheme : वाशिममधील ११,८०९ पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित असल्याने कर्जमाफीचा लाभ रखडला आहे. तांत्रिक अडचणी दूर करून पडताळणी पूर्ण करण्याचे प्रशासनाचे आवाहन आहे.

Sakshi Sunil Jadhav

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील हजारो पात्र शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. यामागील प्रमुख कारण म्हणजे आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण न होणे. जिल्ह्यातील ११ हजार ८०९ लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण अद्याप बाकी असून, तांत्रिक अडचणींमुळे ही प्रोसेस रखडली आहे.

सुत्रांना मिळालेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यात या योजनेसाठी एकूण ५४ हजार १०३ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ४२ हजार २९४ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच कर्जमाफीची रक्कम संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने अनेक शेतकरी चिंतेत आहेत.


शेतकऱ्यांना सर्वात जास्त अडचण अंगठ्याचे ठसे जुळत नसल्याने, बायोमेट्रिक प्रमाणीकरणातील तांत्रिक अडथळे आणि नेटवर्कच्या समस्यांमुळे अनेक शेतकऱ्यांना वारंवार सेवा केंद्रे आणि बँकांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.

दरम्यान, राज्यभरात कर्जमाफी योजनेत काही लाभार्थी अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, ज्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांना या लाभासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते.

प्रशासनाने शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी संबंधित विभाग, सेवा केंद्रे आणि बँकांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT