Know the rules of early PPF withdrawal and make informed decisions about your investment 
बिझनेस

PPF Withdrawal: मॅच्युरिटीच्या आधी पीपीएफमधील पैसा काढता येतो का? काय आहे नियम?

PPF Withdrawal Rules : पीपीएफ गुंतवणुकीसाठी खूप चांगली योजना आहे. त्यात गुंतवणूक करण्यात कोणताही धोका नाहीये. पण पीपीएफ खात्याची मॅच्युरिटी होण्यापूर्वी तुम्हाला पैसे काढून घ्यायचे आहेत का?काय नियम आहेत, ते जाणून घ्या.

Bharat Jadhav

  • PPF ही दीर्घकालीन, सुरक्षित गुंतवणूक योजना असून त्यावर चांगला व्याजदर मिळतो.

  • 15 वर्षांची मुदत असूनही 7व्या वर्षापासून काही अटींसह पैसे काढता येतात.

  • मुदतपूर्व पैसे काढण्यासाठी अकाउंट होल्डरला काही कारणे द्यावी लागतात, जसे की शिक्षण, वैद्यकीय गरज.

  • PPF मध्ये गुंतवणूक केल्याने कर सवलत देखील मिळते, त्यामुळे ही योजना निवृत्ती नियोजनासाठी उपयुक्त आहे.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खूप चांगली योजना आहे. त्यात गुंतवणूक करण्यात कोणताही धोका नाहीये. त्याचा व्याजदर आकर्षक आहे. यामुळे आर्थिक सल्लागार निवृत्ती नियोजनात याचा समावेश करण्याची शिफारस करतात. दरम्यान अनेक लोक अशा योजनेत गुंतवणूक करू इच्छितात ज्यामध्ये गरज पडल्यास मुदतपूर्तीपूर्वीच पैसे काढण्याची सुविधा असेल. यामुळे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योग्य आहे.(How to withdraw money from PPF account before maturity in India)

ही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खूप चांगली आहे. त्याची वैशिष्ट्ये खूपच आकर्षक आहेत. ही योजना कर दृष्टिकोनातूनही चांगली आहे. मुदतपूर्तीच्या रकमेवर कोणताही कर नाही. व्याजावरही कोणताही कर लागत नाही. जर करदात्याने जुन्या आयकर पद्धतीचे पालन केले तर तो कलम ८०सी अंतर्गत कर कपातीचा दावा देखील करू शकतात.

Public Provident Fund १५ वर्षांत होते मॅच्युरिटी

१५ वर्षांत मॅच्युरिटी होत असते. सरकार दर तिमाहीत त्याच्या व्याजदराचा आढावा घेत ते कमी जास्त करते. सध्या व्याजदर ७.१ टक्के आहे. या योजनेला सरकारदेखील मदत करत असते. ज्यामुळे यामध्ये गुंतवणूक करण्यात कोणताही धोका नसतो. त्यामुळे ज्यांना गुंतवणुकीत कमी जोखीम हवी असेल तर ते गुंतवणूकदार या योजनेत गुंतवणूक करू शकतात. एका आर्थिक वर्षात या योजनेत जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवणूक वजावटीचा दावा करता येतो.

मॅच्युरिटीआधीच पैसे काढण्याची सुविधा

पीपीएफची खासियत अशी आहे की, गुंतवणूकदार मुदतपूर्तीपूर्वी (१५ वर्षे) या योजनेतून काही पैसे काढू शकतात. अर्थात यासाठी काही अटी आहेत. ज्या दिवशी पीपीएफमध्ये खाते उघडले असेल त्या दिवसापासून ५ वर्षांनी या योजनेतून अंशतः पैसे काढता येतात. गुंतवणूकदार चौथ्या वर्षानंतर खात्यातील शिल्लक रकमेच्या ५०% पर्यंत पैसे काढू शकतो. जर तुम्ही १ जानेवारी २०२५ रोजी पीपीएफ खाते उघडले असेल आणि १ जानेवारी २०२९ रोजी तुमच्या खात्यात ३ लाख रुपये जमा असतील. तर तुम्ही १ जानेवारी २०२९ नंतर १.५ लाख रुपयांपर्यंत पैसे काढू शकता.

या योजनेचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे उपचार आणि शिक्षणासाठी पैशांची आवश्यकता असल्यास, ही योजना मुदतपूर्तीपूर्वी बंद करता येते. यासाठी खाते ५ वर्षे जुने असले पाहिजे. याचा अर्थ असा की खाते उघडल्यानंतर ५वर्षांनी ते विशेष परिस्थितीत बंद करता येते. पण लक्षात जेव्हा तुम्ही वेळेआधी ही योनजेतून पैसे काढून घेत असाल म्हणजेच पीपीएफ खाते बंद करत असेल तर एकूण व्याजाच्या रक्कमेवर एक टक्के पेनाल्टी लागते. या योजनेचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूकदार मॅच्युरिटीनंतरही या योजनेचा कालावधी ५ वर्षांसाठी वाढवू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalebi History : जिलेबीचा उगम भारतात नव्हे, तर या देशात! वाचा गोड इतिहास एका क्लिकवर

MNS: 'नरेस, सुरेस, परेस, चड्डीत राहायचं!', मनसेचा अमराठी भाषिकांना इशारा; संदीप देशपांडेंच्या टी-शर्टने वेधलं लक्ष

Rinku Rajguru: में ख़ुद अपनी तलाश में हूँ...; रिंकू राजगुरुचे रॉयल लूक फोटो पाहिलेत का?

Tulsi For Mental Health : अशाप्रकारे करा तुळशीचा वापर, मानसिक तणावापासून सुटका मिळवा

Horoscope : 10 ते 15 ऑगस्टपर्यंत बारा राशींचे संपूर्ण राशी, वाचा फक्त एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT