ppf Saam Tv
बिझनेस

PPF, NPS किंवा सुकन्या समृद्धी योजनेत खातं आहे? ३१ मार्चपर्यंत करा हे काम, अन्यथा बंद होईल अकाउंट

PPF, NPS and Sukanya Samruddhi Yojana Rule: पीपीएफ, एनपीएस आणि सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ३१ मार्चपर्यंत तुम्हाला हे काम करायचे आहे.

Siddhi Hande

सरकारी योजनेत गुंतवणूक केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी

पीपीएफ, एनपीएस किंवा सुकन्या समृद्धी योजनेच्या लाभार्थ्यांनी हे काम करा

३१ मार्चआधी हे काम कराच

सरकारच्या अनेक योजनांनमध्ये नागरिक गुंतवणूक करतात. यामध्ये काही योजना मुलींसाठी आहेत काही योजना सेवानिवृत्तीसाठी आहेत.यामधील गुंतवणूक ही सुरक्षित आणि चांगला परतावा देणारी असते. जर तुमचेही एनपीएस, पीपीएफ किंवा सुकन्या समृद्धी योजनेत अकाउंट असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. तुम्हाला ३१ मार्चपर्यंत हे काम करायचे आहे अन्यथा तुमचे खाते बंद होईल.

पीपीएफ योजना (PPF Scheme)

पीपीएफ योजनेत दर वर्षी कमीत कमी ५०० रुपये जमा करणे अनिवार्य आहे अन्यथा खाते बंद होते. खाते बंद झाल्यावर तुम्हाला लोन मिळत नाही याचसोबत पैसे काढण्याचीही सुविधा मिळत नाही. जर तुम्ही वर्षात पैसे जमा केले नाही तर ५० रुपये भरावे लागतात.

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samruddhi Yojana)

सुकन्या समृद्धी योजना ही मुलींसाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेत वर्षाला कमीत कमी २५० रुपये गुंतवायचे आहेत. जर तुम्ही पैसे जमा केले नाही तर खाते डिफॉल्ट लिस्टमध्ये जाते. हे अकाउंट पुन्हा सुरु करण्यासाठी वर्षभरासाठी २५० रुपये फी द्यावी लागेल.

एनपीएसचे नियम (NPS Rule)

नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये तुम्हाला १००० रुपये गुंतवणूक करायचे आहे. जर हे पैसे भरले नाही तर अकाउंट फ्रीज होऊ शकते. याचसोबत १०० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

हे काम आताच करा

जर तुम्ही अजूनही या योजनेत ही रक्कम भरली नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही योजनेत कमीत कमी रक्कम गुंतवा. ३१ मार्च २०२६ आधी हे काम करा अन्यथा तुम्हाला फटका बसू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT