सध्या महागाई खूप वाढत चालली आहे. त्यामुळे भविष्यासाठी आत्तापासूनच थोडी रक्कम बाजूला काढून ठेवाल तर तुम्हाला खूप फायदा होईल. तुम्हाला पोस्टाच्या अनेक योजनांमध्ये गुंतवूणक करून भविष्यात जास्त फायदा मिळू शकतो. पुढील माहितीत आपण पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉजिट स्कीम (Post Office Recurring Deposit)बद्दल जाणून घेणार आहोत.
तुम्हाला Post Office Recurring Deposit स्कीममध्ये फार कमी म्हणजे महिन्याला ३३३ रुपयांची गुंतवणूक करायची आहे. याच्या मॅच्युरिटीनंतर तुम्हाला १७००००० रुपयांचा निधी मिळतो.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला गुंतवणुकीवर ६.७ टक्के इतकं व्याज मिळतं. सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला १०० रुपयांपासून यामध्ये गुंतवणूक करता येते. १० वर्षांपर्यंतच्या अल्पवयीन मुलांनाही खातं उघडण्याची परवानगी यामध्ये असते. पण मुलं कुटुंबातील सदस्यांच्या मदतीनेच गुंतवणूक करू शकतात. मुलांची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर, ते नवीन केवायसी (KYC) आणि नवीन खातं उघडण्याचा अर्ज भरून स्वतः खातं चालवू शकता.
तुम्ही दररोज फक्त ३३३ वाचवून ₹१७ लाखांचा फायदा मिळवू शकता. हे गणित खूप सोपं आहे. यामध्ये दिवसाला तुम्ही ३३३ रुपये जमा केलेत तर, तुमची महिन्याची रक्कम ही एकूण १०,००० रुपये होईल. सरकारच्या ६.७ टक्के व्याजाच्या दराचा विचार करता, ५ वर्षांसाठी ६,००,००० रुपयांची नियमित गुंतवणूक केल्यावर तुम्ही एकूण १.१३ लाख व्याज मिळवाल. तुमचा निधी वाढून ७,१३,६५९ रुपये होईल.
जर तुम्ही हे आणखी ५ वर्षांसाठी वाढवले, तर एकूण ठेव १२ लाख रुपये होतील आणि मिळणारं व्याज वाढून ₹५,०८,५४६ होईल. आता एकूण रक्कम ही १,७०८,५४६ होईल. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीची रक्कम निवडू शकता आणि त्यानुसार तुम्हाला फायदा मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.