Post OPost Office Schemeffice Scheme google
बिझनेस

Post Office Scheme : पोस्टाची जबरदस्त योजना! दरमहा फक्त ₹12,500 गुंतवा अन् मिळवा १ कोटी, वाचा संपूर्ण माहिती

Post Office PPF : पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत दर महिन्याला १२५०० गुंतवून दीर्घकालीन चक्रवाढ व्याजाचा लाभ घ्या. टॅक्सवर सवलत, सुरक्षित गुंतवणूक आणि २५ वर्षांमध्ये १ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी तयार करण्याची संधी मिळू शकते.

Sakshi Sunil Jadhav

प्रत्येक व्यक्तीला त्याच्या भविष्यासाठी गुंतवणूक करायची असते. त्यासाठी चांगल्या योजना शोधून त्यामध्ये गुंतवणूक केली जाते. पण यामध्ये जास्त परतावा देणाऱ्या योजनांमध्ये लोक मोठ्या संख्येने गुंतवणूक करतात. त्यासाठी पोस्टाची पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) ही सर्वात लोकप्रिय आणि सुरक्षित योजना मानली जाते. तुम्ही या योजनेत गुंतवणूक करून नक्कीच मालामाल होऊ शकता.

पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्याने म्हतारपणात तुम्हाला आर्थिक मदत मिळते. जे लोक सरकारी नोकरी करत नाहीत. त्यांच्यासाठी पोस्टाच्या योजना खूप फायदेशीर ठरतात. सध्या PPF योजनेवर सरकारडून वर्षाला ७.१ टक्के व्याज दिलं जातं. या योजनेतली व्याज हे दर महिन्याच्या ५ तारखेपासून महिना अखेरीपर्यंत खात्यात असलेल्या शिल्लक रकमेवर केली जाते. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या १ ते ५ तारखेपर्यंत जमा केल्याने त्या महिन्याचंही व्याज मिळतं.

PPF ही EEE (Exempt-Exempt-Exempt) दर्जाची योजना आहे. यामध्ये इनकम टॅक्स कलम ८० सी अंतर्गत वर्षाला १.५ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर करसवल मिळते. सोबत व्याज आणि मुदतपूर्तीच्या वेळेस मिळणारी संपूर्ण रक्कमही टॅक्स फ्री असते. त्यामुळे टॅक्स बचत आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मिती या दोन्हीने ही योजना फायदेशीर ठरते.

या योजनेचा कालावधी १५ वर्षांचा आहे. पण गुंतवणूकदारांना त्यानंतर ५ - ५ वर्षांच्या कालावधीसाठी खातं वाढवण्याची सुविधा यामध्ये आहे. यामुळे चक्रवाढ व्याजाचा जास्त लाभ मिळून मोठा निधी तयार होऊ शकतो.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने दर महिन्याला १२५०० रुपये, म्हणजेच वर्षाला १.५ लाख रुपये PPF खात्यात जमा केले, तर १५ वर्षामध्ये त्याची एकूण गुंतवणूक २२.५० लाख होते. ७. १ टक्के व्याजदरानुसार मॅच्युरिटीच्यावेळी ४०.६८ लाख रुपयांचा निधी तयार होऊ शकतो.

त्यानंतर खातं दोनदा म्हणजेच आणखी १० वर्षांसाठी वाढवत गुंतवणूक सुरू ठेवल्यावर २५ वर्षात एकूण गुंतवणूक ३७.५० लाख रुपये होते. चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळाल्यानंतर एकूण १.०३ कोटी रुपयांपेक्षा जास्त होऊ शकतो. त्यामुळे शिस्तबद्ध गुंतवणूक करणाऱ्यांसाठी PPF योजना मालामाल होण्यासाठी फायदेशीर ठरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: 7 दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर कोकणवासीयांचा परतीचा प्रवास

बंद असलेले सर्व कबुतरखाने तातडीने सुरू करा; अन्यथा... जैन मुनींचा विधानसभा अध्यक्षांना इशारा

Monday Horoscope: नवीन जबाबदारीपासून आर्थिक नियोजनापर्यंत; वाचा तुमचं राशीभविष्य काय सांगतं?

Mumbai : मित्रांची टोळी जमवा अन् रात्री मुंबई फिरा! 'ही' ७ ठिकाणे नाईट आउटसाठी एकदम खास

EPS Pension Hike: वेज सीलिंग वाढल्यास मिळणार ₹12,500 पेन्शन? वाचा संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT