Sakshi Sunil Jadhav
पनीर सारखंच टोफूचेही अनेक पदार्थ तयार करतात. जर तुम्ही पहिल्यांदाच टोफूची भाजी बनवणार असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
दोन कप टोफूचे चौकोनी तुकडे, टोमॅटो, एक कांदा, शिमला मिरची, कांद्याची पात, जिरं, आलं, मसाला, धणेपूड, गरम मसाला, तेल, मीठ, हळद आणि कोथिंबीर इ.
कढईमध्ये मोहरी किंवा ऑलिव्ह ऑईल गरम करून टोफूचे तुकडे हलके सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
आता त्याच कढईत जिरं आणि आलं परतून टोमॅटो, हळद आणि मीठ घाला. टोमॅटो पूर्णपणे मऊ होईपर्यंत शिजू द्या.
साहित्यामध्ये मसाला, धणेपूड घालून कांदा आणि शिमला मिरची परता. मग त्यात टोफू घालून घ्या.
त्यामध्ये गरम मसाला मिक्स करा आणि २ ते ३ मिनिटं शिजवा. त्याला जास्त मॅश होऊ देऊ नका.
आता गॅस बंद केल्यावर वरून फ्रेश चिरलेली कोथिंबीर आणि कांद्याची पात मिक्स करा. यामुळे भाजीला सुगंध आणि चव जास्त वाढते.