Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळणार ४.५० लाख रुपये

Post office National Saving Certificate Scheme: पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला खूप फायदा होणार आहे. या योजनेतून तुम्हाला फक्त व्याजातून ४.५० लाख रुपये मिळणार आहेत.

Siddhi Hande

पोस्ट ऑफिसची नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम

फक्त व्याजातून मिळतात ४.५० लाख रुपये

आयुष्यभर आर्थिक अडचण येणार नाही

प्रत्येकालाच आपल्या भविष्याची काळजी असते. त्यामुळे आतापासूनच आर्थिक बचत करणे गरजेचे आहे. तुम्ही जर आतापासून थोडे पैसे बाजूला काढून ठेवले तर तुमच्याजवळ भविष्यात चांगला फंड तयार होईल. यामुळे तुम्हाला भविष्यात कधीच आर्थिक अडचण येणार नाही. पोस्टाच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये तुम्ही गुंतवणूक करु शकता. या योजनेत तुम्हाला चांगलाच परतावा मिळणार आहे.

पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट या योजनेतून तुम्ही लाखो रुपये कमवू शकतात. फक्त व्याजातूनच तुम्हाला ४.५० लाख रुपये मिळू शकतात.

पोस्ट ऑफिसची ही बचत योजना खूप लोकप्रिय आहे. या योजनेत कोणत्याही प्रकारची रिस्क नाहीये. या योजनेतील गुंतवणूकीवर सरकार स्वतः गॅरंटी देते. या योजनेत तुम्हाला चांगले व्याजदर मिळते.या योजनेतील गुंतवणूकीनंतर तुम्हाला नियमित इन्कम मिळतो.

योजनेत मिळते ७.७ टक्के व्याज

पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला ७.७ टक्के व्याज मिळते. या व्याजावर चक्रवाढ व्याजदेखील मिळते. या योजनेत मॅच्युरिटीनंतर तुमच्या खात्यात थेट पैसे जमा केले जातात. या योजनेचा लॉक इन पीरियड ५ वर्षांचा आहे. यासाठी तुम्हाला व्याजदर दिले जाणार आहे.

पोस्ट ऑफिसच्या योजनेत १००० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त कितीही रुपये गुंतवू शकतात. या योजनेत एका आर्थिक वर्षात १.५ लाखांपर्यंत टॅक्स सूट मिळते.

पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत १० लाख रुपये गुंतवावे लागणार आहे. या योजनेत ७.७ टक्के व्याजदर मिळते. लॉक इन पीरियड कालावधीसाठी तुम्हाला गुंतवणूक करायची आहे. तुम्हाला एकूण १४,४९,०३४ रुपये मिळणार आहेत.फक्त व्याजातून तुम्हाला ४,४९,०३४ रुपये मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून वाद, दुकान चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT