post office monthly income scheme  Saam tv
बिझनेस

Monthly Income Scheme : घरबसल्या महिन्याला ९००० रुपये कमवा; पोस्टाची खास योजना, वाचा सविस्तर

post office monthly income scheme : तुम्ही पोस्ट ऑफिसच्या योजनेतून महिन्याला ९००० रुपये कमवण्याची संधी आहे. वाचा पोस्टाची खास योजना

Vishal Gangurde

तुम्हाला घरबसल्या महिन्याला ठराविक रक्कम कमवायची असेल. तर तुमच्यासाठी पोस्टाची जबरदस्त योजना आहे. तुम्ही पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेच्या माध्यमातून महिन्याला सुरक्षित कमाई करू शकता. ही योजना निवृत्त, गृहिणी, गुंतवणूदारांसाठी फायदेशीर आहे.

पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजना ही बचतीची खास योजना आहे. या योजनेत खात्यात जमा असलेल्या रक्कमेवर महिन्याला व्याज मिळतं. ही योजना भारतीय डाक विभागाची आहे. यासाठी तुम्ही देशाच्या कोणत्याही पोस्टाच्या शाखेत जाऊन खाते उघडू शकता. त्यानंतर तुम्हाला खात्यात एकरक्कमी गुंतवणूक करावी लागेल. या योजनेच्या माध्यमातून ५ वर्षांपर्यंत महिन्याला गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर व्याज मिळेल.

पोस्ट ऑफिसच्या योजनेत कमीत कमी १००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही वैयक्तिकरित्या पोस्ट खात्यात ९ लाख रुपयांची गुंतवणूक करु शकता. संयुक्त खाते(३ जण) असल्यास १५ लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल. सध्या योजनेत ७.४ टक्के व्याजदर लागू आहे. या योजनेच्या माध्यमातून महिन्याला व्याजाची रक्कम मिळतं. उदा. तुम्ही १५ लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल. तर तुम्हाला महिन्याला ९,२५० रुपये मिळतील.

दरम्यान, भारतीय नागरिकत्व असलेल्या व्यक्तीला पोस्टात बँक खातं उघडता येईल. संयुक्त खात्यात तिघे जण एकत्र खाते उघडू शकतात. १० वर्षे पूर्ण असलेल्या मुलांच्या नावावरही खाते उघडता येईल. गतीमंद मुलगा किंवा अल्पवयीन मुलांच्या नावावरही आई-वडीलांना खाते उघडता येईल.

पोस्टाच्या योजनेची मुदत ५ वर्षांसाठी आहे. ५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदाराला गुंतवणूक केलेली मूळ रक्कम पुन्हा मिळते. या योजनेच्या माध्यमातून व्याजाच्या स्वरुपात उत्पन्न मिळवता येते. तुमच्या इच्छेनुसार, तुम्ही १ वर्षानंतर खाते बंद देखील करु शकता. मात्र, यासाठी तुमच्या खात्यातून दंडात्मक कपात केली जाते. जर खाते ३ वर्षानंतर बंद केलं, तर खात्यातून 2% रक्कम कपात केली जाते. ३ ते ५ वर्षांच्या दरम्यान खाते बंद केल्यास 1 टक्के कपात केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळाच्या पाहणी दौऱ्याला दांडी; जिल्हाधिकाऱ्यांनी केज तहसीलदारांचा पदभार तडकाफडकी काढला

Maharashtra News Live Update: मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडासह जोरदार पाऊस

१ मेसेजचे १४ पैसे घेणार WhatsApp! १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम?

Skipping Dinner For Diabetes: रात्रीचे जेवण टाळल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो का? रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

SCROLL FOR NEXT