MSSC Scheme Saam Tv
बिझनेस

MSSC Scheme: पोस्टाची 'ही' योजना होणार बंद? मिळतंय भरघोस व्याज; गुंतवणूकीसाठी उरले १५ दिवस

Mahila Sanmam Saving Certificate Yojana: महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे. त्यामुळे ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर गुंतवणूक करा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महिलांसाठी खास महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूकीवर तुम्हाला जबरदस्त परतावा मिळतो. ही योजना आता लवकरच बंद होणार आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ आहे. त्यामुळे तुमच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी अवघे १५ दिवस उरले आहेत. (MSSC Scheme)

या योजनेत गुंतवणूकीसाठी मार्च २०२५ शेवटची तारीख आहे. यानंतर ही योजना बंददेखील होऊ शकते किंवा योजनेत गुंतवणूकीचा कालावधी वाढवलादेखील जाऊ शकतो.

या योजनेत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सशक्त करणे असा आहे. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी २ वर्षांचा आहे. या योजनेत तुम्ही २ वर्षांसाठी गुंतवणूक करु शकतात. या योजनेत वार्षिक ७.५ टक्के व्याज मिळते. ही एक सुरक्षित योजना आहे. या योजनेसाठी तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडू शकतात.

या योजनेत तुम्ही १००० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. जास्तीत जास्त २ लाख रुपये गुंतवू शकतात. या योजनेत तुम्हाला २ वर्षानंतर चांगले व्याजदर मिळते. या योजनेत जर खातेधारकांचा मृत्यू झाला तर खाते बंद केले जाईल. या योजनेत तुम्ही चांगले व्याज मिळवू शकतात.

या योजनेत जर तुम्ही दोन वर्षांसाठी २ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला २.३२ लाख रुपये मिळणार आहे. ही योजना एफडीप्रमाणेच काम करते. या योजनेत मिळणाऱ्या व्याजावर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे. या योजनेत व्याज दर महिन्यांनी महिलांच्या खात्यात जमा केले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार! २ महत्त्वाच्या शहरांना जोडणार; जाणून घ्या 'A टू Z' माहिती

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT