Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: महिलांसाठी खास योजना! एकदा गुंतवणूक करा अन् २ वर्षात लखपती व्हा; जाणून घ्या सविस्तर

Post Office Mahila Saving Certificate Scheme: पोस्ट ऑफिसची महिलांसाठी खास योजना आहे. महिला बचत प्रमाण योजनेअंतर्गत महिलांना एकदाच गुंतवणूक करायची आहे. या गुंतवणूकीवर महिलांना भरघोस व्याज मिळणार आहे.

Siddhi Hande

सरकारच्या महिलांसाठी अनेक योजना आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये अनेक योजना आहेत. पोस्ट ऑफिसची महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही एक योजना आहे. पोस्ट ऑफिस बचत योजनेअंतर्गत महिलांना गुंतवणूकीवर भरघोस परतावा मिळणार आहे.

पोस्ट ऑफिसच्या महिला सन्मान बचत योजनेअंतर्गत महिलांना चांगले व्याज दिले जाते. या योजनेत गुंतवणूक केल्यावर महिला दोन वर्षात लखपती होऊ शकतात. या योजनेअंतर्गत तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अकाउंट उघडावे लागणार आहे.

सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांना ७.५ टक्के व्याजदर दिले जाते. या योजनेत तुम्ही फक्त दोन वर्षांसाठी गुंतवणूक करु शकतात. सरकारने २०२३ मध्ये ही योजना सुरु केली होती. या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त २ लाख रुपयांची गुंतवणूक करु शकतात. कमीत कमी कालावधीत अधिक परतावा मिळणार आहे.

महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत TDS कपातीतून सुटका मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला दरवर्षी ४० ते ५० हजार रुपये व्याज मिळणार आहे. या योजनेत १० वर्षीय मुलीदेखील अर्ज करु शकतात.

जर तुम्ही या योजनेत २ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला त्यावर ३१,१२५ रुपये व्याज मिळेल. त्यामुळे या योजनेत महिलांनी गुंतवणूक केल्यास त्यांना चांगला परतावा मिळणार आहे.पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही या योजनेअंतर्गत खातं उघडू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT