Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: पोस्टाची महिलांसाठी जबरदस्त योजना! २ वर्षाच्या गुंतवणुकीवर मिळणार २.३२ लाख रुपये; जाणून घ्या

Mahila Sanman Saving Certificate: केंद्र सरकार देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नवनवीन योजना राबवत असतात. देशात महिलांना आपल्या भविष्यासाठी पैशांची तरतूद करण्यासाठी पोस्ट ऑफिसद्वारे योजना राबवल्या जातात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केंद्र सरकार देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नवनवीन योजना राबवत असतात. देशात महिलांना आपल्या भविष्यासाठी पैशांची तरतूद करण्यासाठी पोस्ट ऑफिसद्वारे योजना राबवल्या जातात. त्यातील एक योजना म्हणजे महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट. या योजनेअंतर्गत तुम्हाला गुंतवणूकीवर चांगले व्याजदर मिळते. ही एक स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे.

पोस्ट ऑफिसद्वारे राबवलेल्या या योजनेत गुंतवणूकीवर चांगला परतावा मिळतो. यात तुम्हाला कर सवलत ते अगदी मासिक उत्पन्न अशा अनेक सुविधा मिळतात. या योजनेत तुम्हाल २ वर्ष गुंतवणूक केल्यास २. ३२ लाख रुपये मिळतील.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र

महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेत १००० रुपये ते अगदी २ लाख रुपये जमा करु शकतात. या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त २ लाख रुपयांची गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्ही एकापेक्षा जास्त खाती उघडू शकतात.फक्त दोन खाते उघडण्यासाठी ३ महिन्यांचे अंतर असावे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत तुम्हाला ७.५ टक्के व्याज दिले जाते. हे व्याजदर तीन महिन्यांच्या आधारावर जमा केले जाते. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी फक्त २ वर्षांचा आहे. तुम्हाला गुंतवणूक केलेल्या तारखेच्या एका वर्षानंतर रक्कमेच्या ४० टक्के रुपये काढता येतील. या योजनत मॅच्युरीटीआधी एकदाच पैसे काढू शकता.

या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त दोन लाखांची गुंतवणूक करु शकतात. त्यावर तुम्हाला ७.५० टक्के व्याजदर मिळते. त्याप्रमाणे ३२,०४४ रुपये तुम्हाला व्याजदर मिळेल. त्यामुळे मॅच्युरिटीनंतर तुम्हाला २,३२,०४४ रुपये मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' ब्लड ग्रुपच्या व्यक्ती असतात सर्वात हुशार, प्रत्येक कामात मिळतं यश

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

SCROLL FOR NEXT