Poco X6 Neo आज भारतीय बाजारपेठेत लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन Poco X6 सिरीजचा सर्वात स्वस्त फोन असेल. कंपनीने भारतमध्ये पोको एक्स ६ आणि पोको एक्स ६ प्रो मोबाईल लॉन्च झाल्यानंतर हा मोबाईल लॉन्च करण्यात आलाय. दरम्यान Poco ने फ्लिपकार्टवर यासाठी आधीच एक सपोर्ट पेज लाईव्ह केले आहे, त्यात फोनचे काही फिचर्स सांगण्यात आले आहेत.(Latest News)
Poco X6 Neo चे फिचर्स
स्मार्टफोनमध्ये 120Hz AMOLED पॅनेल आहे ज्याची पीक ब्राइटनेस 1,000 nits आहे. फोनच्या पुढील बाजूस कॉर्निंग गोरिल्ला ग्लास पाच प्रोटेक्शन मिळालं आहे. Poco च्या नवीन मिड-रेंज फोनमध्ये 3x झूम सेन्सरसह 108MP प्राथमिक कॅमेरा असेल. स्क्रीन-टू-बॉडी रेशो 93.3% असेल आणि पंच-होल डिस्प्ले डिझाइन फोनच्या पुढील बाजूस आहे. X वरील टिपस्टर अभिषेक यादवने फोनच्या काही फिचर्सचा खुलासा केलाय. स्मार्टफोन TSMC 6nm प्रक्रियेवर आधारित MediaTek Dimensity 6080 प्रोसेसरने सुसज्ज असेल. फोनमध्ये Mali G57 GPU देण्यात आले आहे.
पोकोच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये LPDDR4x रॅम आणि UFS 2.2 स्टोरेज मिळू शकते.Poco X6 Neo मध्ये 108MP रियर कॅमेरा आणि 16MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा देण्यात आलाय. स्मार्टफोन 33W फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करेल. मोबाईलची बॅटरी 5,000 mAh असेन. Poco X6 Neoमध्ये ब्लूटूथ 5.3, WiFi 5, एक 3.5 मिमी ऑडिओ जॅक, ड्युअल स्टीरिओ स्पीकर, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर मिळवू शकतो
एका रिपोर्टनुसार स्मार्टफोनची किंमत भारतात 16,000 रुपयांपासून सुरू होईल. याशिवाय एका टिपस्टरने म्हटले आहे की Poco X6 Neo Android 13 वर चालू शकतो. कंपनी या स्मार्टफोनसोबत 2 वर्षांचे OS अपडेट आणि 4 वर्षांचे सिक्युरिटी पॅच देत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.