PM Vishwakarma Yojana Saam Tv
बिझनेस

Government Scheme: स्वत:चा व्यवसाय सुरू करायचाय? सरकारकडून मिळतंय हमीशिवाय ३ लाखांचं कर्ज, जाणून घ्या योजना

PM Vishwakarma Scheme Benefits: सरकार नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. सरकारच्या पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत लोकांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत मिळते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सरकार नेहमीच नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतात. नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, त्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारच्या अनेक योजना आहे. या योजनांमध्ये नागरिकांना आपला स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज दिले जाते. त्याचसोबत चांगले शिक्षण, वैद्यकीय सेवा उपलब्ध केली जाते. अशी एक योजना म्हणजे पीएम विश्वकर्मा योजना. (PM Vishwakarma Yojana)

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत लहान मोठ्या व्यावसायिकांना आर्थिक पाठबळ मिळते. या योजनेअंतर्गत सोनार, लोहार, न्हावी, शिंपी असलेल्या अनेक लोकांना ३ लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते. याचसोबत तुम्हाला सुरुवातील ५०० रुपयांची स्टायपेंडदेखील मिळते.

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत लोकांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर त्यांना ३ लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते. जर तुम्हाला मूर्ती बनवण्याची कला येत असेल तर तुम्हाला यातून उद्योग उभा करता येऊ शकतो. त्याचसाठी सरकार तुम्हाला कर्ज देते. या योजनेत तुम्हाला तुमचे कौशल्य अजून वाढवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. या योजनेच दोन टप्प्यात लोन दिले जाते. सुरुवातीला १ लाखांचे लोन दिले जात जाते. त्यानंतर व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी २ लाख रुपयांचे लोन दिले जाते. या लोनसाठी कोणत्याही प्रकारची हमी देण्याची गरज नाही.

सप्टेंबर २०२३ मध्ये ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत १८ ट्रेडमधील लोकांना कर्ज मिळून शकते. या योजनेत लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत. अर्जदार हा भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे. अर्जदाराचे वय १८ पेक्षा जास्त आणि १५ पेक्षा कमी असणे गरजेचे आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी लोकांकडे मान्यप्राप्त संस्थेचे ट्रेडचे प्रमाणपत्र असायला हवे. अर्जदार १४० जातींपैकी एक असणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

WhatsApp Tips : स्मार्टफोन चोरीला गेलाय? प्रायव्हेट चॅट्स लीक होण्यापूर्वी लगेच करा 'हे' काम, अन्यथा होईल मोठा अनर्थ

Shivali Parab: 'पुराना ज़माना नया हो गया है...'; कल्याणच्या चुलबुलीचा बोल्ड साडी लूक, शिवालीचे मोहक फोटो व्हायरल!

Back Dark Spots : साडीमध्ये पाठ काळी दिसतेय? पाठीवरचे डाग कमी करण्यासाठी 4 झटपट उपाय

Home Fragrance: घरात 5-स्टार हॉटेलसारखं वातावरण हवंय, हे सीक्रेट्स बदलून टाकेल घराचा संपूर्ण माहोल

SCROLL FOR NEXT