PM SVANidhi Yojana meta ai
बिझनेस

PM SVANidhi Yojana : फेरीवाल्यांसाठी खुशखबर! मिळणार ₹30,000 पर्यंत क्रेडिट कार्ड; 50 दिवस व्याज नाही

PM SVANidhi Big Update: पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत पात्र स्ट्रीट वेंडर्सना ३० हजार रुपयांपर्यंत क्रेडिट कार्ड, ५० दिवसांपर्यंत टॅक्स फ्री क्रेडिट आणि डिजिटल व्यवहारांवर कॅशबॅकचा लाभा मिळू शकतो.

Sakshi Sunil Jadhav

केंद्र सरकारकडून विविध योजना राबवून प्रत्येक व्यक्तीला आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातच देशातल्या छोट्या व्यावसायिकांना आणि स्ट्रीट वेंडर्सना मदत मिळाली म्हणून ' प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) योजना सध्या राबवली जात आहे. यामध्ये पात्र असणाऱ्यांना कर्जासोबत क्रेडिट कार्डची सुविधाही मिळू शकते.

पीएम स्ट्रीट वेंडर्स योजनेमध्ये वेंडर्सना कोणतीही हमी न देता तीन टप्प्यांमध्ये कर्ज दिलं जातं. पहिल्या टप्प्यात १५ हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात २५ हजार आणि तिसऱ्या टप्प्यात ५० हजार रुपयांपर्यंतचं कर्ज मिळतं.

कोणाला क्रेडिट कार्ड मिळणार?

ज्या स्ट्रीट वेंडर्सनी पीएम स्वनिधी अंतर्गत घेतलेले दुसऱ्या टप्प्यातले कर्ज वेळेवर फेडलंय, तसेच तिसऱ्या टप्प्यातल्या कर्जासाठी पात्र आहेत किंवा त्यांनी तिसरे कर्ज घेतलंय, त्यांना UPI-Linked RuPay Credit Card मिळू शकतं. या कार्डची क्रेडिट लिमिट ३० हजार रुपयांपर्यंत असू शकतं. तिसऱ्या टप्प्यातलं कर्ज पूर्ण फेडलेले लाभार्थी सुद्धा या सुविधेसाठी अर्ज करू शकतात.

२० ते ५० दिवसांपर्यंत टॅक्स फ्री क्रेडिट

या क्रेडिट कार्डाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे वेळेवर बिल भरल्यावर २० ते ५० दिवसांपर्यंत टॅक्स फ्री क्रेडिट मिळू शकतं. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी स्ट्रीट वेंडर्सना किरकोळ आणि घाऊक डिजिटल व्यवहारांवर १,६०० रुपयांपर्यंत कॅशबॅक प्रोत्साहन दिलं जातं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

OTT Releases : 'या' आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल? नव्या चित्रपटांसह वेब सीरिज अन् रिॲलिटी शोची मेजवानी!

धक्कादायक! मेट्रोमध्ये फक्त सीटवरून वाद, तरूणाचा करुण अंत; आरोपीचं हायप्रोफाईल कनेक्शन समोर

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसेकडून आजपासून सह्यांची मोहीम

Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

SCROLL FOR NEXT