PM Mudra Scheme Saam Tv
बिझनेस

PM Mudra Yojana: तरुणांसाठी खुशखबर! स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळते २० लाखांचे कर्ज; अर्ज कसा करावा?

PM Mudra Yojana For Business: तरुणांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी पीएम मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज दिले जाते. या योजनेत २० लाखांचे कर्ज देण्यात येते.

Siddhi Hande

स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल लागते. यासाठी तुम्हाला लोन घ्यावे लागते. परंतु लोनसाठी खूप जास्त व्याज द्यावे लागते. याचसोबत गॅरंटीदेखील द्यावी लागते. केंद्र सरकारने तरुणांसाठी खास पीएम मुद्रा योजना राबवली आहे. या योजनांमध्ये व्यवसाय सुरु करण्यासाठी २० लाखांचे कर्ज दिले जाते.

पीएम मुद्रा योजनेअंतर्गत (PM Mudra Yojana)तरुणांना २० लाखांचे लोन दिले जाते. कोणत्याही गॅरंटीशिवाय हे लोन दिले जाणार आहेत. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.

पीएम मुद्रा योजनेअंतर्गत स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. याचसोबत व्यवसायाचा विस्तार करण्यासाठीही पैसे दिले जातात. या योजनेत खूप कमी व्याजदर आकारले जाते. या योजनेत तरुणांना ५०,००० ते २० लाखांचे कर्ज दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही प्रोसेसिंग फी भरावी लागत नाही. तुम्हाला फक्त जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करायचा आहे.

पीएम मुद्रा योजनेतील कर्जावर फक्त १० त १२ टक्के व्याज द्यावे लागते. याआधी फक्त १० लाखांपर्यंतचे लोन देत होते. आता यात वाढ करण्यात आली आहे. ज्यांनी अर्ज केलाय त्यांना याआधीचे लोन पूर्णपणे फेडले तरच त्यांना लोन दिले जाणार आहे.

या योजनेत तीन प्रकारचे लोन दिले जाते. पहिले म्हणजे ५० हजार ते ५ लाख त्यानंतर ५ लाख ते १० लाख यानंतर २० लाखांपर्यंतचे लोन दिले जाते. टप्प्याटप्प्याने हे लोन दिले जाते. हे लोन घेण्यासाठी अर्जदाराचा बँक रेकॉर्ड चांगला असावा. तसेच त्याच्याकडे कामाचा अनुभव असावा.

अर्ज कुठे अन् कसा करावा

सर्वात आधी तुम्हाला www.mudra.org.in या वेबसाइटवर जावे लागेल.

यानंतर तुम्हाला लोनचे तीन ऑप्शन मिळतील. त्यातील एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे.

यानंतर फॉर्म डाउनलोड करुन भरावा. यानंतर फॉर्म बँकेत जाऊन सबमिट करा.

यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाते. यानंतर बँकेत अप्रुव केला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT