PM Matritva Vandana Yojana Saam Tv
बिझनेस

PM Matritva Vandana Yojana: गरोदर महिलांना सरकार देतेय ६००० रुपये, PM Matritva Vandana Yojana योजना नक्की आहे तरी काय?

PM Matritva Vandana Yojana: केंद्र सरकारने गरोदर महिलांसाठी पीएम मातृत्व वंदना योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना ६००० रुपये दिले जातात.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांसाठी आतापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत. यातील काही योजना या महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी तर काही योजना लहान मुलांसाठी आहेत. केंद्र सरकारने गरोदर महिलांसाठीही योजना राबवली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत मिळते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी २०१७ मध्ये पीएम मातृत्व वंदना योजना सुरु केली होता. महिला व बाल विकास विभागाकडून ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना ६,००० रुपये मिळतात. आर्थिकदृष्ट्या कमजोर कुटुंबातील महिलांना ही मदत केली जाते. (PM Matritva Vandana Yojana)

प्रधानमंत्री मातृत्व योजनेअंतर्गत गरोदर महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि त्यांच्या मुलाच्या वाढीसाठी ही यजना राबवण्यात आली आहे. या योजनेत गर्भवती महिलांना ६००० रुपये दिले जातात.

पीएम मातृत्व योजनेअंतर्गत ३ टप्प्यांमध्ये पैसे दिले जातात. रजिस्ट्रेशन केल्यानंतर १५० दिवसात तुम्हाला १००० रुपये दिले जातात. त्यानंतर गर्भवती महिलांचे परिक्षण झाल्यानंतर २००० रुपये दिले जातात. यानंतर बाळाच्या जन्मानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यानंतर ६ महिन्याची लस दिल्यानंतर २००० रुपये दिले जातात. (PM Matritva Yojana)

पीएम मातृत्व वंदना योजनेच्या अटी

पीएम मातृत्व वंदन योजनेअंतर्गत गरोदर महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाते.

या योजनेत लाभ घेणाऱ्या महिलेचे वय १९ किंवा त्यापेक्षा जास्त असावे.

या योजनेत महिलांनी अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज करायचा आहे.

या योजनेत फक्त पहिल्या मुलाच्या जन्मासाठी पैसे दिले जाणार आहे.

या योजनेचा लाभ फक्त सरकारी हॉस्पिटलमध्ये दिला जात होता. मात्र, आता प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येही या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT