Namo Shetkari Yojana meta ai
बिझनेस

Namo Shetkari Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ₹४,००० जमा होणार? नमो शेतकरी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; पाहा ताजी अपडेट

PM Kisan Yojana : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याबद्दल मोठी चर्चा सुरू आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हप्ते मिळून ₹४,००० जमा होण्याची शक्यता असून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.

Sakshi Sunil Jadhav

राज्यातील ९० लाख शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. 'पीएम किसान' योजनेचे २ हप्ते एकाचवेळी जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या खात्यावर एकाचवेळी ४ हजार रूपये जमा होण्याची शक्यता आहे. जूनमध्ये पीएम किसान योजनेचा निधी मिळाला. पण फडणवीस सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता अद्याप मिळालेला नाही. रक्षाबंधन अथवा १५ ऑगस्टच्या आसपास शेतकऱ्यांना फडणवीस सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा हप्ता खात्यावर जमा करण्यात येईल.

'पीएम किसान' योजनेचे २,००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊन बराच काळ उलटला आहे. महाराष्ट्रातील लाखो शेतकरी राज्य सरकारच्या 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. महाराष्ट्रात मात्र हा निधी नेमका कधी वर्ग होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. साधारणपणे केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर काही दिवसांतच राज्य सरकारही आपला निधी जारी करते.

मात्र, सध्या राज्य सरकारवर लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांमुळे आलेला आर्थिक ताण आणि निधीच्या तुटवड्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला उशीर होत असल्याची माहिती समोर येत आहे. आता १५ ऑगस्ट किंवा रक्षाबंधनासारख्या मोठ्या मुहूर्तावर सरकार शेतकऱ्यांना ही आनंदाची बातमी देऊन दिलासा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

५ ऑगस्टला मिळणार का आनंदाची बातमी?

'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेच्या आगामी हप्त्याबाबत (Installment) अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील सणाच्या किंवा विशेष दिवसाच्या मुहूर्तावर या योजनेचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाऊ शकतो. येत्या १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन) किंवा २८ ऑगस्ट (रक्षाबंधन) रोजी राज्य सरकार राज्यातील बळीराजाला ही मोठी खूशखबर देईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकारच्या 'पीएम किसान' योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारकडून 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपये दिले जातात. ही रक्कम प्रत्येकी २-२ हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात (DBT) जमा केली जाते.

शेतकऱ्यांच्या खात्यात एकाचवेळी ४ हजार

राज्यातील ९० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार जमा होणार असल्याची चर्चाही सुरू आहे. फडणवीस सरकारकडून पुढील काही दिवसांत आठवा आणि नववा हप्ता जमा केला जाणार आहे. त्यासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागू शकते. कारण, सरकारकडून वर्षभरात ३ हप्त्यात ६ हजार जमा केले जातात. २०२६ च्या सुरूवातीला सरकारकडून यंदाचा पहिला हप्ता जमा केला होता. त्यानंतर पुढील जून महिन्यात पुढील हप्ता जमा होणार होता, पण अद्याप जमा झालेला नाही. आता पुढील २ हप्ते एकत्र जमा होऊ शकतात.

खात्यात पैसे जमा झाले की नाही, असे तपासा

'नमो शेतकरी महासम्मान निधी' या राज्य सरकारच्या योजनेचा हप्ता खात्यात तुमच्या खात्यात जमा झाला काही नाही, तुम्ही घरबसल्या तपासू शकता. त्यासाठी https://nsmny.mahait.org/ या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला भेट द्यावी लागेल. त्यानंतर नोंदणीकृत क्रमांकावरून लॉगइन करावे. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला खात्यात पैसे जमा झाले की नाही, ते स्टेटस दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापूरमध्ये हॉटेल व्यवसायिक आणि प्रशासनामधील बैठकीमध्ये गोंधळ

कुरकुरीत दोडक्याची भजी कशी बनवायची?

Jayanti 2 Marathi Movie: संत्याच्या आयुष्यात नवं वादळ! 'जयंती २'मध्ये उलगडणार सामाजिक परिवर्तनाची कहाणी

Rat Lifespan : तुम्हाला माहितीये का उंदीर किती वर्षे जगतो?

Heart attack: हार्ट अटॅक किंवा कार्डियाक अरेस्टमध्ये काय फरक असतो? सोप्या शब्दांत समजून घ्या

SCROLL FOR NEXT