PM Kisan Yojana meta ai
बिझनेस

PM Kisan Yojana Update : शेतकऱ्यांनो, ₹२००० खात्यात जमा झाले नाही? इथं करा तक्रार, २४ वा हप्ता होईल लगेच जमा

PM Kisan 24th Installment: पीएम किसानचा २४ वा हप्ता खात्यात जमा झाला नाही? अधिकृत वेबसाइटवर स्टेटस तपासा आणि गरज असल्यास पोर्टलवर तक्रार नोंदवून तुमचा ६००० रुपयांचा हप्ता मिळवा.

Sakshi Sunil Jadhav

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी अनेक प्रयत्न करत असतं. त्यातच लाखो शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ दिला जातो. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये दिले जातात. मात्र आत्तापर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मागिल हप्ते जमा झाले नाहीत, त्यांनी पुढे काय प्रोसेस केली पाहिजे? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

आता शेतकऱ्यांचे लक्ष २४ व्या हप्त्याकडे लागले आहे. मात्र हप्ता जाहीर झाल्यानंतरही काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत, तर अशावेळी काय करायचं, असा प्रश्न अनेकांना पडतो. तर अशावेळी सर्वात आधी शेतकऱ्यांनी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला ' pmkisan.gov.in' भेट द्या. येथे ‘Know Your Status’ या ऑप्शनवर क्लिक करून आपली माहिती तपासावी. आपलं नाव लाभार्थी यादीत आहे का, तसेच नोंदणी आणि इतर तपशील योग्य आहेत का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

ऑनलाइन तक्रार कशी कराल?

जर सर्व माहिती योग्य असेल आणि हप्त्याची रक्कम मिळाली नसेल, तर शेतकरी पीएम किसानच्या अधिकृत Grievance पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतात. तक्रार नोंदवताना Registration Number किंवा Temporary ID वापरता येतो. त्यानंतर समस्येचे सविस्तर वर्णन करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करता येतात. तक्रार दाखल केल्यानंतर तिची स्थिती ऑनलाइन तपासण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

राज्याच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क

हप्त्याची अडचण जर राज्यस्तरीय पडताळणी, पात्रता किंवा शेतकऱ्यांच्या रेकॉर्डशी संबंधित असेल, तर संबंधित राज्याच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क करता येतो. PM-KISANच्या अधिकृत पोर्टलवर राज्यनिहाय नोडल अधिकाऱ्यांची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे २४ वा हप्ता खात्यात जमा न झाल्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. सर्वप्रथम ऑनलाइन स्टेटस तपासा आणि समस्या कायम असेल तर अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यातील २०० बसेस कोकणात पाठवण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल

मुंबईकरांनो लक्ष द्या! गणेशोत्सवात 4 पादचारी पूल राहणार बंद; नेमके कोणते?

शिंदेंची लाडकी बहीण, फडणवीसांची लाडकी दीदी, मनोज जरांगेंची उपरोधिक टीका, नेमकं काय म्हणाले?

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार? सौदी अरेबियाने बंद केली कच्च्या तेलाची पाइपलाइन, भारताचे टेन्शन वाढलं

IND vs AFG : ज्याची भीती होती तेच घडलं! टी २० मालिकेआधी भारतीय संघाला जबरदस्त झटका

SCROLL FOR NEXT