सध्या शेतकऱ्यांवर दुष्काळाचं सावट आलेलं आहे. अशातच त्यांनी आर्थिक आधाराचीही गरज असते. त्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत असतं. त्यातल्या पीएम किसान योजनेचा लाभ लाखो शेतकरी घेत आहेत. त्यामध्ये वर्षाला ६००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातात. याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. ४ महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवली जाते. २४ वा २००० रुपयांचा हप्ता हा हप्ता ३० ऑक्टोबर रोजी जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
राज्यातल्या ९१ लाख ८९ हजार शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. तर हा हप्ता गुजरातमध्ये बनासकांठा जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी निधी वितरणाचा कार्यक्रम होणार असल्याचं कृषी विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
पीएम किसान योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकरी कुटुंबांना दर चार महिन्यांनी २,००० रुपयांचा हप्ता दिला जातो. त्यामुळे पुढच्या हप्ताची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार ३० ऑक्टोबर रोजी हप्ता वितरित होणार असल्याचं सांगितलं जातंय.
पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करणं गरजेचं आहे. तसेच बँक खात्याची माहिती, आधारशी संबंधित तपशील आणि योजनेतल्या नोंदणीची माहिती योग्य असणं महत्त्वाचं आहे. ई-केवायसी अपूर्ण असल्यावर किंवा माहितीमध्ये त्रुटी असल्यावर लाभ मिळायला अडचणी येऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी हप्ता जमा होण्याची वाट पाहण्याआधी आपली माहिती तपासून घ्यावी.
शेतकरी घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने हप्त्याची स्थिती तपासू शकतात.
१. सर्वप्रथम pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२. वेबसाइटवर ‘Know Your Status’ या पर्यायावर क्लिक करा.
३. आवश्यक माहिती भरा. गरजेनुसार नोंदणी क्रमांक टाका.
४. स्क्रीनवर दिसणाऱ्या माहितीत हप्त्याची स्थिती आणि ई-केवायसीसंबंधी तपशील तपासा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.