PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! २ दिवसात हे काम कराच अन्यथा पीएम किसानचे ₹२००० बंद होणार

PM Kisan Yojana Do These Work Before 30th April: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना ३० एप्रिलपूर्वी एक महत्त्वाचे काम करायचे आहे. जर तुमच्या अर्जात काही त्रुटी असतील तर त्यामध्ये सुधार करायचा आहे.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेबाबात महत्त्वाची अपडेट

३० एप्रिलपूर्वी हे काम कराच

अन्यथा मिळणार नाही पीएम किसान योजनेचा लाभ

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. पीएम किसान योजनेत वर्षभरात तीन टप्प्यांमध्ये पैसे दिले जातात. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात.दरम्यान, आता पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

शेतकऱ्यांनो ३० एप्रिलआधी हे काम कराच (Farmers Have to do These Work Before 30th April)

पीएम किसान योजनेचा लाखो शेतकरी लाभ घेत आहेत. या योजनेचा लाभ सुरु ठेवण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे काम करायचे आहे. ज्या शेतकऱ्यांना तांत्रिक कारणांमुळे, केवायसी पूर्ण नसल्याने आणि कागदपत्र पूर्तता नसल्याने योजनेचा लाभ मिळत नाही त्यांना एक महत्त्वाचे काम करायचे आहे.

ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही त्यांना आपल्या अर्जातील त्रुटी दूर करता येणार आहे. ३० तारखेपर्यंत नावनोंदणी केलेल्या ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे. ३० एप्रिलआधी त्यांनी हे काम करायचे आगे. त्यांच्या ज्या काही तांत्रिक अडचणी असतील त्या दूर करायच्या आहेत.

सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० एप्रिलनंतर शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जातील त्रुटी दूर करता येणार नाही.योजनेच्या वेबसाइटवर कोणतेही कागदपत्र अपलोड करु शकणार नाही. याचसोबत ज्या शेतकऱ्यांचे अर्ज बाद झाले त्यांना योजनेतून वगळले जाईल. याबाबत टीव्ही ९ मराठीने वृत्त दिले आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या अर्जात काही त्रुटी असतील त्यांनी लवकरात लवकर त्या दूर करायच्या आहेत. शेवटचे २ दिवस उरले आहेत. तोपर्यंत अपडेटेड कागदपत्रदेखील अपलोड करा, असं आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता हे काम करायचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आज पुणे स्टेशनवरून एकही लोकल सुटणार नाही

३२ वर्षीय बायकोचे शिक्षकासोबत अफेअर; ४५ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्य संपवलं, नागपुरातील धक्कादायक घटना

Gayatri Datar Mangalsutra Design: शिव-शक्तीचं प्रतीक आणि सौभाग्याचं लेणं! गायत्री दातारच्या 'दोन वाट्यांच्या' मंगळसूत्राने वेधलं लक्ष

PM Modi Plays Football: प्रचार थांबताच पंतप्रधान मोदी सिक्कीममध्ये, मुलांसोबत खेळले फुटबॉल, पाहा फोटो

BOB Recruitment: कोणतीही परीक्षा नाही, थेट बँक ऑफ बडोदात नोकरी; भरघोस पगार मिळणार; अर्ज कधीपर्यंत करता येणार? वाचा

SCROLL FOR NEXT