PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! हे काम आताच करा, अन्यथा पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता मिळणार नाही

PM Kisan Yojana Installment: पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. या योजनेत केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

Siddhi Hande

केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना लोकप्रिय आहे. या योजनेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. देशातील कोट्यवधी शेतकरी या योजनेचा लाभ घेतात. या योजनेत शेतकऱ्यांना दर वर्षी ६००० रुपये दिले जातात.या योजनेत आता काही शेतकऱ्यांना पुढचा हप्ता मिळणार नाहीये.

पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता देण्यात आला आहे. दरम्यान, आता शेतकरी २० व्या हप्त्याची वाट बघत आहे. हा हप्ता जून महिन्याला दिला जाऊ शकतो. सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केली नाही. दर चार महिन्यानंतर हे पैसे दिले जाणार आहेत.

या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचे पैसे (These Farmers Will not get PM Kisan Yojana Benefit)

पीएम किसान योजनेचा हप्ता काही शेतकऱ्यांना मिळणार नाही. केंद्र सरकारच्या गाइडलाइन्सनुसार, ई-केवायसी आणि जमिनीचे व्हेरिफिकेशन करणे अनिवार्य आहे. जेणेकरुन सरकारला शेतकऱ्यांची आणि त्यांच्या जमिनीची माहिती मिळेल. ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत केवायसी केले नाही त्यांना या योजनेचे पैसे मिळणार आहे. ज्यांनी याआधीही ई- केवायसी केले नाही त्यांना १९ वा हप्ता मिळाला नव्हता.

सर्व पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने ही प्रकिया सुरु केली आहे. जेणेकरुन जे शेतकरी खरंच या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना पैसे मिळतील.

ज्या शेतकऱ्यांनी याआधी ई-केवायसी केले नाही त्यांनी जून २०२५ पर्यंत करुन घ्यावे. अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने केवायसी करु शकतात. त्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे. तिथे फार्मर्स कॉनर्स यावर क्लिक करायचे आहे तिथे तुम्हाला केवायसीचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा आणि आधार नंबर टाका. तुमच्या आधारशी लिंक असलेल्या फोनवर ओटीपी येईल. यानंतर तुमचे व्हेरिफिकेशन पूर्ण होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं? आदिती तटकरेंनी सांगितली सगळी कारणं

Maharashtra News Live Update: नालासोपाऱ्यात परदेशी महिलेवर हल्ला

भाजप स्लो पॉयझन, शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय, कामाख्या देवीला माहितीय; माजी मंत्री अब्दुल सत्तारांचा सनसनाटी आरोप

Success Story : अपमानाचे शब्द थेट काळजाला भिडले! रिक्षाचालकाचा मुलगा थेट IAS अधिकारी झाला

Parbhani : विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात ठाकरेंनी उतरवला हुकमी एक्का

SCROLL FOR NEXT