PM Kisan 24th installment  meta ai
बिझनेस

PM Kisan Yojana : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2,000 जमा होणार? 24व्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट

PM Kisan 24th Installment: पीएम किसान योजनेच्या २४व्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दिवाळीआधी २,००० मिळणार का? याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

PM Kisan 24th Installment: दिवाळीचा सण जवळ आला की शेतीची कामंही वाढतात. अशात शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असते. सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी विविध योजना राबवत असतं. त्यातीलच पीएम किसान योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची ठरते. यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येक हप्त्याला २००० रुपये खात्यात जमा केले जातात. आता शेतकऱ्यांना २४ वा हप्ता कधी येईल, आणि आला तर दिवाळीआधीच येईल का? हा प्रश्न पडला आहे. पण सरकारकडून या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागेल.

पीएम किसानचा २४ वा हप्ता कधी येणार?

केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षाला ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येक हप्त्याला २००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) बँक खात्यात जमा केली जाते.

दोन हप्तांमध्ये चार महिन्यांच्या आसपास अंतर असतं. त्यामुळे पुढचा हप्ता दिवाळीआधी मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. पण फक्त हप्त्यांमधलं अंतर लक्षात घेऊन पैसे जमा होण्याची तारीख ठरवला येणार नाही.

कोणत्या शेतकऱ्यांना २,००० रुपये मिळणार?

पीएम किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक पात्रता आणि कागदपत्रांची पूर्तता केलेली असणं गरजेचं आहे.

ई - केवायसी (e-KYC) - प्रोसेस पूर्ण असणं आवश्यक.

जमिनीची नोंद - जमिविषयक कागदपत्रांची पडताळणी पूर्ण असावी.

बँक खातं - खात्याची माहिती अचूक असावी.

आधार आणि DBT - लागू असलेल्या आवश्यक प्रोसेस पूर्ण असाव्यात.

कोणाला मिळणार नाही योजनेचा लाभ?

आयकर भरणारे शेतकरी, काही सरकारी अधिकारी आणि कर्मचारी तसेच डॉक्टर, अभियंते, वकील, चार्टर्ड अकाउंटंट यांसारखे निर्धारित निकषांनुसार अपात्र ठरणारे व्यावसायिक या योजनेच्या लाभासाठी पात्र नसतात. ठरावीक निकषांनुसार काहीनिवृत्तिवेतनधारकही अपात्र ठरू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शरद पवारांची भेट घेणार

Malai Kofta Recipe: घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटपट बनवा हॉटेलस्टाईल क्रीमी आणि चविष्ट मलाई कोफ्ता, वाचा रेसिपी

Political News : भाजपसोबत आणखी एक पक्ष करणार युती, अमित शाहांनी दिले संकेत

Kojagiri Purnima : चंद्राच्या प्रकाशात ठेवलं जातं दूध, कोजागिरी पौर्णिमेची 'ही' अनोखी परंपरा तुम्हाला माहीत आहे का?

Gold Rate Today : सोने चांदीच्या दरात मोठे बदल! १ तोळा सोने १९०० रुपयांनी घसरले; वाचा 18K,22K, 24k चे ताजे दर

SCROLL FOR NEXT