PM Kisan 24th installment  meta ai
बिझनेस

PM Kisan Yojana: ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपयांचा हप्ता येणार? वाचा नविन अपडेट

PM Kisan 24th installment : पीएम किसान योजनेची २४ वा हप्ता ऑक्टोबर २०२६ मध्ये येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

Sakshi Sunil Jadhav

सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी विविध योजना राबवत असतं. त्यातील सर्वात प्रसिद्ध योजना म्हणजे पीएम किसान योजना. या योजने संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता २०२६ मध्ये जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र केंद्र सरकारकडून अद्याप २४ व्या हप्त्याच्या तारखेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत अपडेटची प्रतीक्षा करणं महत्त्वाचं आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६००० रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम २ हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. ही रक्कम Direct Benefit Transfer (DBT) पद्धतीने पाठवली जाते.

याआधी पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता २० जून २०२६ रोजी जारी करण्यात आला होता. त्यावेळी ९.४४ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये १८,८८० कोटी रुपयांहून जास्त रक्कम हस्तांतरित करण्यात आली होती.

ऑक्टोबरमध्ये २४ वा हप्ता येणार का?

२४ वा हप्ता ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता व्यक्त करण्यामागे दोन प्रमुख कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे हप्त्यांचे वेळापत्रक आहे. त्यामध्ये पीएम किसान योजनेत साधारणपणे चार महिन्यांच्या अंतराने हप्ते दिले जातात. जूनमध्ये २३ वा हप्ता जारी झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये चार महिन्यांचा कालावधी पूर्ण होतो.

दुसरं कारण म्हणजे सणांचा काळ. यामध्ये दसरा आणि दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून सरकारकडून हप्ता जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

शेतकऱ्यांनी e-KYC पूर्ण केली आहे का ते तपासा

पीएम किसानचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी आपली e-KYC पूर्ण आणि अपडेट ठेवणं गरजेचं आहे. बँक खात्याची KYC अपडेट नसेल किंवा आधार प्रमाणीकरणात अडचण असल्यास हप्ता अडकण्याची शक्यता असते.

याशिवाय शेतकऱ्यांनी आधार क्रमांक, बँक खाते, जमीन अभिलेख आणि वैयक्तिक माहिती योग्य आहे की नाही, हे तपासावे. कोणतीही माहिती चुकीची किंवा अपूर्ण असल्यास लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये गणेश विसर्जनाला प्रारंभ

Amrit Bharat : नव्या अमृत भारत ट्रेनची घोषणा; ४ राज्यातून धावणार,२० स्थानकावर थांबणार, A टू Z माहिती

चहाची टपरीवाला,भाजी विक्रेत्यालाही GSTची नोंदणी करावी लागते? जाणून घ्या नियम

घरात आढळणारी पाल खरंच विषारी असते का? चावा घेतल्यास काय करावं?

Nalasopara Beach : काळसर वाळू अन् मनमोहक सूर्यास्ताचा अनुभव; मुंबईजवळचा ‘हा’ बीच आहे खास

SCROLL FOR NEXT