PM Kisan 24th Installment Date meta ai
बिझनेस

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! लवकरच खात्यात ₹2000 येणार, संभाव्य तारीख समोर

PM Kisan 24th Installment Date: पीएम किसान योजनेच्या २४ व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ऑक्टोबरमध्ये २००० रुपये मिळण्याची शक्यता आहे.

Sakshi Sunil Jadhav

शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकार महत्त्वाच्या योजना राबवत आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी आणि दैनंदिन खर्चासाठी होतो. सध्या पीएम किसान योजनेचा लाभ (PM Kisan Yojana) लाखो शेतकऱ्यांना मिळत आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात २३ हप्ते पाठवण्यात आले आहेत. यामध्ये वर्षाला एकूण ६ रुपये दिले जातात. हे पैसे ३ टप्प्यात दिले जातात. आता २४ व्या हप्ताबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. यामध्ये हप्त्याची संभाव्य तारीख समोर आली आहे.

पीएम किसानचा लाभ कधी मिळणार?

पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी २ हजार रुपयांचा हप्ता दिला जातो. मागच्या म्हणजेच २३ वा हप्ता २० जून २०२६ रोजी जारी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

त्यानुसार २० ऑक्टोबरला मागच्या हप्त्याला चार महिने पूर्ण होतात. त्यामुळे २४ वा हप्ता २० ऑक्टोबर किंवा त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र ही तारीख अधिकृतपणे ठरलेली नाही. सरकारकडून हप्त्याची तारीख साधारणपणे काही दिवस आधी जाहीर केली जाते.

कोणाला मिळणार ४००० रुपयांचा लाभ?

२४ वा हप्ता जाहीर झाल्यानंतर काही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ४,००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांचा मागचा हप्ता तांत्रिक कारणामुळे अडकला असेल आणि तो नंतर मंजूर झाला, अशा प्रकरणांमध्ये मागच्या २,००० आणि या महिन्याचे २,००० रुपये जमा होऊ शकतात. मात्र, प्रत्येक शेतकऱ्याला ४००० रुपये मिळतील असं नाही. लाभार्थ्याची पात्रता आणि मागच्या हप्त्याची स्थिती यावर रक्कम अवलंबून असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

'टेस्ला'च्या फ्लाईँग कारवर मीम्स व्हायरल, मस्क यांच्या निर्मितीला भारतीयांची मिश्किल दाद

Punjab Accident: भरधाव कारनं मनरेगा मजुरांना चिरडलं; 8 जणांचा जागीच मृत्यू

बाळूमामाची शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक, गोकुळ'च्या निवडणुकीत अंधश्रद्धेचा बाजार

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर १० राऊंड फायरिंग; 2 जण गंभीर जखमी, सिनेसृष्टीत खळबळ

SCROLL FOR NEXT