PM Kisan 23rd Installment Date google
बिझनेस

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात PM किसानचा हप्ता २० जूनला जमा होणार का? महत्वाची माहिती आली समोर

PM Kisan 23rd Installment Date: शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर पुढील तारीख नोंदवून ठेवा. पंतप्रधान मोदींनी योजनेबाबत महत्वाची माहिती आहे.

Sakshi Sunil Jadhav

शेतकऱ्यांसाठी भारतात अनेक योजना राबवल्या जातात. त्यामध्ये त्यांना शेती कामासाठी आर्थिक मदत केली जाते. पीएम किसान योजनेचा लाभा आता भारतातले अनेक शेतकरी घेत आहेत. आत्तापर्यंत या योजनेचे २२ हप्ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. पुढील माहितीत आपण २३ वा हप्ता २० जूनला जमा होणार का? हे जाणून घेणार आहोत.

शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार?

शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.कारण सरकाने पीएम किसान योजनेच्या हप्त्याची तारीख(PM Kisan 23rd Installment Date) जाहीर केली आहे. उद्याच म्हणजे २० जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात २३ वा हप्ता जमा केला जाणार आहे. जवळपास ९.४४ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जातील.

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने गुरुवारी (१८ जून) ही अधिकृत घोषणा केली. मंत्रालयाच्या म्हणण्यांनुसार यावेळी सरकार थेट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण १८,८८० कोटी रुपयांची मोठी रक्कम हस्तांतरित करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर या ठिकाणाहून एका राष्ट्रीय स्तरावरच्या कार्यक्रमात या हप्त्याचं प्रकाशन करणार आहेत. तसेच ते अनेक प्रकल्पांचे उद्धाटन आणि पायाभरणी करणार आहेत.

पीएम किसान योजनेचा हप्ता

पीएम किसान योजनेत अनेक लाभार्थी शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. २० जूनला २३ वा हप्ता आला की, शेतकऱ्यांकडे एकूण ४.४६ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम होईल. कारण यामध्ये वर्षाला ६ हजार रुपये वर्षाला जमा केले जातात. दर ४ महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा केले जातात. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आणि ईकेवायसी पूर्ण करणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला पैसे दिले जाणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Death Certificate: मृत्यूच्या दाखल्याबाबत मोठा निर्णय, १ ऑक्टोबरपासून नियम कडक होणार; नोंदणी केली नाही तर...

Maharashtra News Live Update: आरक्षण उपवर्गीकरणासाठी मुंबईत मातंग समाज आक्रमक

Skin Tone Fashion Tips: फेअर, गव्हाळ की डस्की? स्किन टोननुसार कपड्यांचा रंग निवडण्याच्या ७ खास टिप्स

Janshatabdi Express : जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; पेण स्थानकात ३ तासांपासून रेल्वे रखडली, प्रवाशांचे हाल

Aloo Tikki Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आलू टिक्की; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT