Sakshi Sunil Jadhav
सगळ्यांनाच मे महिन्याच्या सुट्टीत पिकनिकला जाता आलं नाही. तुम्ही या विकेंडला एकदम थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जायचा प्लॅन करू शकता.
पुढील माहितीत काही प्रसिद्ध हिल स्टेशनची माहिती दिली आहे. तुम्हाला तिथले दृश्य पाहून पायाखाली ढग तरंगताना दिसतील असं नक्कीच फिल होईल.
संदकफू किंवा संदकपूर हे पश्चिम बंगालमधलं सर्वात उंच म्हणजे समुद्रसपाटीपासून उंचीवर असलेलं शिखर आहे.
बँगलोरजवळ असलेले प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणजे नंदी हिल्स आहे. पावसाळ्यात ढग तिथल्या मोठ मोठ्या घाटांना झाकून घेतात.
कर्नाटकजवळील मुल्लयनगिरी हे १,९३० मीटर उंचीवर असलेलं सर्वात उंच शिखर आहे. पावसाळ्यात धुकं आणि ढगाचं मनमोहक दृश्य तुम्हाला तिथे पाहायला मिळेल.
ओडिसामधल्या घाटात असलेले देवमाली हे सर्वात उंच शिखर मानलं जातं. तुम्ही पावसाळ्याच्या सुरुवातीला या ठिकाणाला भेट देऊ शकता.
केरळमधील मीसापुलिमला हे ठिकाण दुसरं सर्वात उंच शिखर मानलं जातं. सुंदर ट्रेकिंग, हिरवा गार निसर्ग आणि ढगांनी वेढलेल्या दऱ्या तुम्ही इथे पाहू शकता.
दार्जिलिंगजवळ असलेले टायगर हिल हे जगातले सर्वात सुंदर ठिकाण मानले जाते. पावसाळ्यात दऱ्यांजवळ तुम्ही तुमचा वेळ घालवू शकता.