PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांनो हे काम लगेच करा, अन्यथा मिळणार नाही ₹२०००; पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट

PM Kisan Yojana Farmer ID Mandatory: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य केले आहे.

Siddhi Hande

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

पीएम किसानचा हप्ता मिळवण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य

फार्मर आयडी कसं काढायचं?

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. पीएम किसान योजनेचे आतापर्यंत २२ हप्ते देण्यात आले आहेत. त्यानंतर २३वा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, आता पीएम किसानचा २३वा हप्ता रखडू शकतो. पीएम किसानचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला एक काम करायचे आहे. शेतकऱ्यांना आता युनिक फार्मर आयडी अनिवार्य केले आहे. फार्मर आयडीशिवाय तुम्हाला आता पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने फार्मर आयडी काढायचे आहे.

पीएम किसानचा हप्ता मिळवण्यासाठी हे काम करा (PM Kisan Yojana Farmer ID Mandatory)

पीएम किसान योजनेत याआधीच शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्यासाठी सांगितले होते. मात्र, हे काही राज्यांपुरतं अनिवार्य केले होते. यानंतर आता देशातील सर्व शेतकऱ्यांना फार्मर आयडी तयार करायचे आहे. फार्मर आयडी नसेल तर शेतकऱ्यांना पीएम किसानचा २३वा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर फार्मर आयडी काढा.

या राज्यांसाठी फार्मर आयडी अनिवार्य (Farmer ID Mandatory for These State)

केंद्र सरकारने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, आसामधील शेतकऱ्यांना फार्मर आयडी अनिवार्य केले आहे. शेतकरी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने फार्मर आयडी बनवू शकतात. तुम्हाला कृषी पोर्टलवर जाऊन किंवा जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन फार्मर आयडी बनवता येणार आहे.

फार्मर आयडी कसं बनवायचं? (How to Make Farmer ID)

सर्वात आधी तुम्हाला https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ या वेबसाइटवर जा.

यानंतर तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचे आहे.

यानंतर Create New User वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमचा आधार नंबर टाका.

तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. यानंतर तुमची सर्व माहिती भरायची आहे.

केवायसी पूर्ण करायची आहे. यानंतर Agristack link येथे नंबर टाकायचा आहे.

यानंतर ओटीपी वेरिफाय करा. पासवर्ड टाकून अकाउंट अॅक्टिव्हेट करा.

यानंतर तुम्हाला लॉग इन करायचे आहे. तिथे तुमची सर्व माहिती टाका.

यानंतर व्यवसायाची माहिती विचारली जाईल. तिथे शेतजमिनीचा मालक क्लिक करा.यानंतर शेतीबाबतची सर्व माहिती भरा.

यानंतर ओटीपी टाकून तुमचे रजिस्ट्रेशन करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं ₹४००० तर चांदी ११००० रुपयांनी महागली, युद्ध थांबताच काही तासात विक्रमी वाढ; वाचा ताजे दर

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मद्यधुंद दुचाकीस्वाराने लहान मुलाला उडवले; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Professional Cuddler Job: मार्केटमध्ये आलाय नवीन जॉब, मिठी मारा अन् लाखो रूपये कमवा

Actress Mother Death : मातृछत्र हरपले! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचे निधन, बॉलिवूडवर शोककळा

Eknath Shinde: मोठी बातमी! एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT