PM Kisan 23rd Installment google
बिझनेस

PM Kisan Yojana: जून महिना आला तरी शेतकऱ्यांचं खातं रिकामं, कधी मिळणार पीएम किसान योजनेचा हप्ता?

PM Kisan 23rd Installmen Date: जून महिना सुरु झाला तरी पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. कृषी मंत्रालयाकडून काही घोषणा आल्यात का? याकडे शतेकऱ्यांचे लक्ष आहे.

Sakshi Sunil Jadhav

शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत म्हणून पीएम किसान योजना राबवली जाते. आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर २२ हप्ते पाठवण्यात आले आहेत. आता पुढील २३ वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जून महिना सुरु झाला तरी शेतकऱ्यांचं खातं रिकामं असल्यामुळे याच्या तारखेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळत असेल. आता २३ व्या हप्त्याबद्दल सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण याच महिन्यात आर्थिक वर्षाचा पहिला हप्ता येण्याची सर्वात जास्त शक्यता आहे.

कृषी मंत्रालयाचे आदेश आले का?

पीएम किसान योजनेसंदर्भात कृषी मंत्रालयाकडून आत्तापर्यंत २३ व्या हप्त्याबद्दल कोणतीही अपडेट समोर आली नाही. पण गेल्या दोन ते तीन वर्षांचा अंदाज घेता, आर्थिक वर्षाचा पहिला हप्ता जून- जुलै किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाठवला जातो. त्यामुळे या वर्षी सुद्धा शेतकऱ्यांना याच कालावधीत हप्ता दिला जाईल असा अंदाज आहे.

मागील हप्ते कधी देण्यात आले होते?

पीएम किसान योजनाचा २०२३ मध्ये १४ वा हप्ता जुलै महिन्यात पाठवण्यात आला होता. २०२४ मध्ये जून महिन्यात १७ हप्ता पाठवण्यात आला. २०२५ मध्ये ऑगस्ट महिन्यात हा हप्ता दिला. त्यामुळे २३ वा हप्ता सुद्धा याच महिन्यांमध्ये पाठवण्यात येईल असा अंदाज आहे.

या वर्षी, हवामान विभागाने (IMD) महत्वाची शक्यता सांगितली. त्यामध्ये भारतातला पाऊस सरासरीपेक्षा कमी सुमारे ९०% असेल. त्यामुळे, सरकार जून महिन्यात शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता देऊ शकतं. तसेच सरकारकडून अजुनही कोणतेही अधिकृत माहिती किंवा सुचना आलेल्या नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागील कारण काय?

MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडका; मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सचा परवाना रद्द

Strait of Hormuz : होर्मुझमध्ये आता 'ट्रम्प टॅक्स', जहाजांवर अमेरिका 20% शुल्क लावणार, इराणचा विरोध

SCROLL FOR NEXT