PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता 'या' तारखेला होणार जमा; मोठी अपडेट आली समोर

PM Kisan Sanman Nidhi Yojana: पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ६००० रुपये दिले जातात. या योजनेत पुढचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये दिले जातात. ३ हप्त्यांमध्ये ही रक्कम दिली जाते. आता शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत पुढचा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १८ वा हप्ता जारी करण्यात आला आहे. त्यानंतर आता १९ वा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिली जाण्याची शक्यता आहे. सरकारने अजूनपर्यंत अधिकृतपणे घोषणा केली नाही. यंदाचे अर्थसंकल्पीय बजेट फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जारी करण्याची घोषणा करण्यात येणार आहे.केंद्र सरकारचे बजेट १ फेब्रुवारी २०२५ ला जाहीर होणार आहे.(PM Kisan Sanman Nidhi Yojana)

पीएम किसान योजनेत तुमचा स्टेटस असा चेक करा (PM Kisan yojana status)

पीएम किसान सन्मान निधी योजनेत लाभार्थ्यांचे नाव आहे की नाही हे खाली दिलेल्या पद्धतीने चेक करा.

तुम्ही https://pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा.

त्यानंतर Beneficiary Status या सेक्शनवर क्लिक करा.

त्यानंतर होमपेजवर दिलेल्या ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर तुम्ही तुमचे आधार नंबर, बँक खाते नंबर आणि मोबाईल नंबर टाका.

यानंतर माहिती सबमिट केल्यानंतर तुमच्या स्क्रिनवर योजनेबाबत सर्व अपडेट मिळतील.

मोबाईल नंबर कसा लिंक करायचा? (how to link mobile number with pm kisan yojana)

पीएम किसान पोर्टलवर मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. तसेच केवायसी करणेदेखील गरजेचे आहे.

मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी CSC वर किंवा https://pmkisan.gov.in वर लॉग इन करा.

त्यानंतर अपडेट मोबाईल नंबरवर क्लिक करा.

यानंतर आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका. यानंतर वेरिफिकेशन रिक्वेस्ट सबमिट करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Update 2026 : मान्सून सर्वात शेवटी कोणत्या राज्यात पोहोचतो? कारण जाणून घ्या

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये डोमेस्टिक गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराचा पर्दाफाश; 251 सिलेंडर जप्त

केळी खाल्ल्याने मूळव्याध बरा होतो का?

घायवळ गँगला मोठा हादरा; कुख्यात गुंड घायलवळच्या भावाला अटक, राजस्थानमधून मुसक्या आवळल्या

Influencer Anita Bishnoi: रडत लाईव्ह आली अन् उचललं टोकाचं पाऊल; इन्फ्लुएंसर अनीता बिश्नोईचा लाईव्हमध्ये आत्महत्येचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT