PM Kisan Yojana saam tv
बिझनेस

PM Kisan Yojana : राज्यातील ९१ लाख शेतकऱ्यांना मिळाले पैसे; पण कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही २००० रुपयांचा हप्ता?

PM Kisan 24th Installment: महाराष्ट्रातल्या ९१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा २४ वा हप्ता जमा झाला.

Sakshi Sunil Jadhav

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्यासाठी राज्यातल्या ९१ लाख १२ हजार ७६५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १ हजार ८३५ कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. गुजरातमधील बनासकांठा येथे झालेल्या कार्यक्रमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थान येथून दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभाग घेतला. कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग यावेळी उपस्थित होते.

प्रधानमंत्री मोदी म्हणाले, केंद्र सरकारच्या विविध धोरणांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये देशातल्या शेतकऱ्यांना ५० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली तसेच त्यांच्या खर्चात बचत झाली आहे. देशातल्या ८५ टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या लहान शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ४ लाख कोटी रुपये थेट बँक खात्यांत देण्यात आले आहेत.

जागतिक बाजारात खतांच्या किमती वाढल्यानंतरही केंद्र सरकारने त्याचा भार शेतकऱ्यांवर पडू दिला नाही. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खते उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने सुमारे १६ लाख कोटी रुपये खर्च केले. गेल्या १२ वर्षांत गहू आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीच्या माध्यमातून २४ लाख कोटी रुपये देण्यात आले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांना २ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक भरपाई मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं.

सिंचनावरील खर्च कमी करण्यासाठी पीएम कुसुम योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे १२ लाख सौरपंप देण्यात आले आहेत. या पंपांमुळे शेतकऱ्यांची ८० कोटी लिटरपेक्षा जास्त डिझेलची बचत झाली आहे. याशिवाय अतिरिक्त वीज निर्मितीचाही शेतकऱ्यांना लाभ होत असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी स्पष्ट केले.

बदलत्या हवामानाशी सुसंगत बियाण्यांच्या सुमारे तीन हजार नव्या जाती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असून, राष्ट्रीय गोकुळ अभियानातून देशी पशुधनाचे संवर्धन आणि वैज्ञानिक प्रजननाला चालना दिली जात आहे. पशूंना लाळ्या-खुरकुत रोगापासून वाचविण्यासाठी देशभर मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे १५० कोटी लसमात्रा देण्यात आल्या असून, ८ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पशुधनाला त्याचा लाभ झाला आहे. देशातील गाय आणि म्हशींचे प्रतिदिन सरासरी दूध उत्पादन २०१३-१४ मधील पाच लिटरपेक्षा कमी पातळीवरून आता सुमारे आठ लिटरपर्यंत वाढल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी नमूद केले.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित ‘रन फॉर युनिटी’मध्ये नागरिकांनी, विशेषतः युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदानीच्या वीज प्रकल्पाचे काम चालूच

Gold Loan Rules: गोल्ड लोन फेडल्यानंतरही सोने मिळाले नाही? बँकेने उशीर केल्यास द्यावे लागणार दररोज ५ हजार रुपये, वाचा नवे नियम

kitchen Tips : भाजीची पातळ झालीय? चव न बदलता घट्ट करण्यासाठी करा हे ५ सोपे घरगुती उपाय

मुंबईची वाहतूक कोंडी कमी होणार; असा आहे राज्य सरकारचा 'पाताल लोक' प्लान

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; शिवसेना नेत्याला वेगळाच संशय, थेट चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT