PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना पीएम किसानचा २३वा हप्ता कधी येणार? या दिवशी जमा होऊ शकतात ₹२०००

PM Kisan Yojana 23rd Installment Date: पीएम किसान योजनेचा २३वा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान जून किंवा जुलै महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात.

Siddhi Hande

केंद्र सरकारची पीएम किसान योजना

पीएम किसानचा २३ हप्ता कधी येणार?

या दिवशी खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये दिले जातात. पीएम किसानचे पैसे वर्षातून तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. दरम्यान, आतापर्यंत शेतकऱ्यांना २२ हप्ते देण्यात आले आहेत. त्यानंतर शेतकरी आता २३व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

या दिवशी शेतकऱ्यांना येऊ शकतात ₹२००० (PM Kisan Yojana 23rd Installment of 2000 Rupees May Come on These Date)

केंद्र सरकार वर्षभरात ३ टप्प्यांमध्ये प्रत्येकी २००० रुपये देते. नवीन आर्थिक वर्ष सुरु झाल्यानंतर २ ते ३ महिन्यातच हप्ता दिला जाणार आहे. त्यानुसार आता जून किंवा जुलै महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. दरम्यान, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. लवकरच सरकार याबाबत माहिती देईल.

पीएम किसानचा २२वा हप्ता १३ मार्च रोजी देण्यात आला होता. हा हप्ता येण्यास जवळपास महिनाभर उशिर झाला होता. आसामध्ये एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते हप्त्याचे वितरण करण्यात आले होते. तब्बल ९.३२ कोटी शेतकऱ्यांना पैसे दिले होते.

पीएम किसानचा हप्ता मिळवण्यासाठी हे काम कराच (PM Kisan Yojana eKYC Mandatory)

पीएम किसानचा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ईकेवायसी करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने केवायसी करु शकतात. जे शेतकरी केवायसी करणार नाही त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुर्ती, ड्रेस आणि साड्यांवर सुंदर दिसतील शॉर्ट मंगळसूत्र, लेटेस्ट, ट्रेंडी 5 डिझाईन्स

मोठी बातमी! मनोज जरांगेंची निर्णायक आंदोलनाची घोषणा, तारीखही सांगितली, फडणवीसांना काय दिला इशारा?

Diabetes : पावसाळ्यात थोडासा निष्काळजीपणा मधुमेहींसाठी घातक, 'या' गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास समस्या आणखी वाढेल

Cyber Crime : '1930' सायबर हेल्पलाइनच ठरली फसवणुकीचे हत्यार; खाती गोठवून लाखोंची खंडणी, आरोपी गजाआड

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा गावात अन्न औषध प्रशासन विभागाची धाड

SCROLL FOR NEXT