Google आपल्या वार्षिक डेव्हलपर परिषदेत Google Pixel 8a लॉन्च करणार आहे. हा कार्यक्रम १४ मे रोजी होणार आहे. कंपनी या इव्हेंटमध्ये काही मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. एका रिपोर्टनुसार या इव्हेंटमध्ये कंपनी एक बजेट स्मार्टफोन लॉन्च करू शकते. Google Pixel 8a गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या Pixel 7a ची पुढील आवृत्ती आहे.(Latest News)
Pixel 8a मध्ये चांगल्या डिझाइनसह नवीन टेन्सर चिप देण्यात येणार आहे. सध्या पिक्सेल 8 आणि पिक्सेल 8 प्रोवर उपलब्ध जनरेटिव्ह एआय फीचर्स देण्यात आली आहेत. गुगलचा नवा फोन लॉन्च होण्यासाठी अजून दोन महिने बाकी आहेत. परंतु त्याआधी या फोनचे फीचर्स समोर आली आहेत.
Google चा नवा फोन Pixel 8a चे Pixel 8 सारखे डिझाइन देण्यात आले आहे. मेटल फ्रेम, ग्लास बॅ क या फोनला असेल. Pixel 7a च्या तुलनेत हा फोन संपूर्णपणे नव्या प्रकारे बनवण्यात आला आहे. Pixel 8a वापरण्यासाठी आरामदायी असणार आहे. या फोनमध्ये एक मोठी बॅटरी देण्यात आली असून वायरलेस पद्धतीने फोन चार्ज होऊ शकतो.
Google Pixel 8a मध्ये 90Hz रिफ्रेश रेट सह 6.1-इंचाचा डिस्प्ले असेल. या गुगल फोनमध्ये उत्तम स्क्रीन संरक्षण देण्यात आले आहे. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळण्याची शक्यता आहे. Pixel 8a मध्ये 13 MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्ससह 64 MP कॅमेरा देण्यात आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.