EPFO Profile Photo Update Google
बिझनेस

EPFO Alert : PF संदर्भात मोठी अपडेट, आजच करा हे महत्वाचं काम; नाही तर भविष्यात नॉमिनिला पैसे मिळणार नाहीत

PF New Rule: आधार, पॅन, बँक खाते, मोबाईल व ई-मेलसह प्रोफाइल फोटो अपडेट ठेवल्याने EPF, EPS, विमा लाभ, पेन्शन सेवा आणि इतर डिजिटल सुविधा कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळेल.

Sakshi Sunil Jadhav

जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) चे सदस्य असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. EPFO ने सर्व सदस्यांना युनिफाइड मेंबर पोर्टलवर (Unified Member Portal) त्यांचा प्रोफाइल फोटो अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. हा फोटो ई-नॉमिनेशन पूर्ण करण्यासाठी आणि ऑनलाइन PF क्लेम करताना ओळख पडताळणीसाठी फायदेशीर ठरेल.

प्रोफाइल फोटो अपडेट का महत्त्वाचा आहे?

EPFO ने दिलेल्या माहितीनुसार, प्रोफाइल फोटो तुमची ओळख (Visual Identity) म्हणून काम करतो. त्यामुळे ऑनलाइन सेवांदरम्यान खातेदाराची ओळख सहज पडताळता येते. सर्व सेवांसाठी फोटो अनिवार्य नसला तरी ई-नॉमिनेशनसाठी तो आवश्यक आहे.

ई-नॉमिनेशनचा फायदा

ई-नॉमिनेशनच्या मदतीने सदस्य त्यांच्या कुटुंबातल्या पात्र व्यक्तीला नॉमिनी करू शकतात. समजा सदस्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर EPF, EPS आणि Employees Deposit Linked Insurance याचा लाभ नॉमिनीला मिळणं सोपं होतं. प्रोफाइलमधली माहिती आणि फोटो नवीन अपडेट असल्यास EPFO ला ऑनलाइन पडताळणी करणं सोपं जातं. त्यामुळे PF क्लेमची प्रोसेस वेगाने पूर्ण होते आणि कागदपत्रांची गरजही कमी होते.

पुढील माहिती अपडेट ठेवा

EPFO ने सदस्यांना पुढची माहिती योग्य लिंक आणि व्हेरिफाय ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

आधार कार्ड

पॅन कार्ड

बँक खाते

मोबाईल क्रमांक

ई-मेल आयडी

ही माहिती अपडेट असेल तर PF Withdrawal, ई-नॉमिनेशन, पेन्शन सेवा आणि इतर डिजिटल सुविधा कोणत्याही अडथळ्याशिवाय वापरता येतात.

प्रोफाइल फोटो कसा अपडेट कराल?

१. EPFO Unified Member Portal वर UAN पासवर्ड आणि कॅप्चाच्या मदतीने लॉगिन करा.

२. प्रोफाईल किंवा View या विभागात जा.

३. प्रोफाइल फोटो अपडेट करण्याचा पर्याय निवडा.

४. सध्याचा पासपोर्ट साइज फोटो निवडून अपलोड करा.

५. सेव्ह वर क्लिक करून सबमिट करा.

६. फोटो नीट दिसतोय हे तपासूनच ई-नॉमिनेशन किंवा पीएफ क्लेम प्रोसेस पूर्ण करा.

महत्त्वाची सूचना: ही माहिती सर्वसाधारण मार्गदर्शनासाठी आहे. EPFO कडून वेळोवेळी जारी होणाऱ्या अधिकृत सूचना आणि नियमांची खात्री करूनच पुढील प्रक्रिया पूर्ण करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिड महिन्यापासून मानधन न मिळाल्याने अमरावती महानगरपालिकेतील सफाई कामगार संपावर

BP-Diabetes : पावसाळ्यात हाय बीपी अन् मधुमेहाच्या रुग्णांनी 'या' चुका टाळा, नाहीतर बिघडेल तब्येत

India Inflation: महागाईचा भडका उडाला, तुमचा EMI पुन्हा वाढणार? सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं

मांड्यावरची चरबी मेणासारखी वितळेल! 'ही' सोपी पद्धत वापरून पाहा

बैलगाडा शर्यतीतील खुन्नस! पुण्यात रागाच्या भरात 'थार'ने उडवलं

SCROLL FOR NEXT