Sakshi Sunil Jadhav
आजच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये तणाव, अपुरी झोप आणि चुकीच्या आहारामुळे हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure) ही झपाट्याने वाढते.
जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते आणि रक्तदाब वाढण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे जेवणात कमी मीठ वापरण्याचा प्रयत्न करा.
बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज यांसारख्या पदार्थांमध्ये मीठ, तेल आणि कॅलरीज जास्त असतात. हे पदार्थ नियमित खाल्ल्यास रक्तदाब वाढू शकतो.
प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये सोडियम आणि प्रिझर्व्हेटिव्ह्जचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हाय बीपी असलेल्या व्यक्तींनी असे पदार्थ कमी खावेत.
कोल्ड ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक आणि जास्त साखर असलेली पेये वजन वाढवतात. यामुळे रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
भजी, समोसे, पुरी किंवा इतर तळलेले पदार्थ कोलेस्टेरॉल वाढवू शकतात. त्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो.
सॉसेज, सलामी, बेकन यांसारख्या प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये मीठ आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज भरपूर असतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवणे कठीण होऊ शकते.
लोणचे, पापड आणि तयार चटण्यांमध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते. यांचे वारंवार सेवन केल्यास रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.
अल्कोहोल आणि तंबाखूचे सेवन रक्तवाहिन्यांवर वाईट परिणाम करते. त्यामुळे रक्तदाब वाढण्यासोबतच हृदयविकाराचा धोका देखील वाढतो.
हिरव्या भाज्या, फळे, संपूर्ण धान्य आणि पोटॅशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. दररोज किमान ३० मिनिटे चालणे किंवा हलका व्यायाम केल्यास रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
हा लेख सर्वसाधारण माहितीच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास किंवा आहारात मोठे बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.