PF Claim Saam Tv
बिझनेस

PF Claim: PF क्लेम करताना 'या' चुका कधीच करु नका, अन्यथा होईल नुकसान

PF Claim News: पीएफ अकाउंटमध्ये जमा केलेली रक्कम ही एक गुंतवणूक असते. पीएफ क्लेम करताना या चुका कधीच करु नका अन्यथा तुम्हाला अडचणी येऊ शकतात.

Siddhi Hande

संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. पीएफ खात्यात कर्मचाऱ्यांच्या पगारातील १२ टक्के रक्कम जमा केली जाते. यातील काही रक्कम कर्मचाऱ्याच्या पगारातून तर काही रक्कम नियोक्त्याकडून जमा केली जाते. पीएफ अकाउंटमधील पैसे ही एक गुंतवणूक असते. (EPFO)

पीएफ खात्यात जमा करण्यात येणाऱ्या रक्कमेवर व्याज दिले जाते. ही एक गुंतवणूक असते. तुम्ही हे पैसे आप्तकालीन परिस्थितीत काढू शकतात. तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नात, आजारपणात,घराचे बांधकाम करण्यासाठी तुम्ही पैसे काढू शकतात. परंतु पीएफ क्लेम करताना काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

तुम्ही ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन पीएफसाठी क्लेम करु शकतात. तुम्ही पीएफ क्लेम केल्यानंतर ७-१० दिवसानंतर लिंक बँक अकाउंटवर पैसे जाणार आहे.परंतु पीएफ क्लेम करताना चुका करु नका.

जर तुमच्या पीएफ अकाउंटचे केवायसी पू्र्ण नसेल आणि तुम्हाला पैसे काढायचे असेल तर तुमचा विड्रॉल क्लेम रिजेक्ट केला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही केवायसी पूर्ण करुन घ्या.यासाठी ईपीएफओ सदस्यांना ई-सेवा अकाउंटमध्ये लॉग इन असणे गरजेचे आहे. (PF Withdrawal News)

जर तुमच्या ईपीएफओ अकाउंटची जन्मतारीख आणि कर्मचार रेकॉर्डमधील जन्मारीख सारखी नसेल तर तुमचा पीएफ क्लेम रिजेक्ट केला जाईल.तसेज जक तुम्ही चुकीचे अकाउंट डिटेल्स टाकले तर तुमचा ऑनलाइन क्लेम रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळे नेहमी चेक किंवा बँकेची माहिती योग्य टाका. तरच तुमचा पीएफ क्लेम होईल. (PF Withdrawal Process)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT