Petrol Diesel Rate Saam Tv
बिझनेस

Petrol Pump Scam : पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना मीटरमध्ये फक्त '0' नाही तर हे देखील तपासा; दुर्लक्ष केलं तर होऊ शकतं मोठं नुकसान

Petrol Pump Meter Scam : पेट्रोल पंपावर 'जंप ट्रिक' वापरूनही फसवणूक केली जात आहे. त्यामुळे फक्त मीटर फक्त शून्यांवर आहे इतकंच तपासून चालणार नाही.

Sandeep Gawade

आजच्या काळात जवळपास प्रत्येकाकडे दोन चाकी किंवा चार चाकी वाहन असते. लोक नियमितपणे पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल किंवा डिझेल भरवतात. परंतु अनेक वेळा असे आढळते की पेट्रोल पंपावर लोकांसोबत फसवणूक केली जाते. काही वेळा कमी पेट्रोल किंवा डिझेल देण्याच्या प्रकरणात भांडणे होतात. पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांशी लोकांची वादावादी होऊन प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचते.

पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरत असताना नेहमी सांगितले जाते की तुम्ही पेट्रोलचे मीटर तपासा, ते शून्यावर असल्यानंतरच पेट्रोल भरावं. यामुळे पेट्रोल पंप कर्मचारी तुम्हाला फसवू शकणार नाही. पण लक्षात ठेवा, फसवणूक करण्याचा फक्त एकच मार्ग नाही. पेट्रोल पंपावर 'जंप ट्रिक' वापरूनही फसवणूक केली जात आहे. यातून कसे वाचता येईल ते पाहू.

मीटरमध्ये 0 पाहिल्यानंतर ही गोष्ट नक्की तपासा

साधारणता लोकांना सांगितलं जातं की पेट्रोल पंपावरील मीटरमध्ये शून्य दिसल्यानंतर पेट्रोल किंवा डिझेल भरण्यास सुरुवात करावी. यामुळे तुम्हाला पूर्ण पेट्रोल किंवा डिझेल मिळेल आणि तुम्हाला नुकसान होणार नाही. पण एवढे पुरेसे नाही. पेट्रोल पंपावर शून्य पाहून तुम्हाला वाटते की आता तुमची फसवणूक होणार नाही, पण पेट्रोल पंप कर्मचारी शून्यानंतर ट्रिक वापरून तुम्हाला फसवतात. वास्तविक, शून्यानंतर मीटर थेट 5 वर पोहोचतं.

1, 2, 3, 4 पासून सुरुवात न होता ते 5 वरून सुरू होतं. जर तुम्ही शून्य पाहून खूश झालात आणि नंबर जंप झालेले पाहिले नाहीत, तर तुम्हाचं नुकसान होऊ शकतं. म्हणून या गोष्टीकडे लक्ष ठेवा. यासोबतच तुम्ही डेन्सिटी (घनता) वरही लक्ष ठेवायला हवे. पेट्रोल पंपाच्या मशीनवर अमाउंट आणि वॉल्यूमनंतर तिसऱ्या क्रमांकावर डेन्सिटी दर्शवली जाते. यामध्येही काही गडबड केली जात नाही ना हे बघा.

पेट्रोल पंपाची तक्रार कशी कराल जर पेट्रोल पंप कर्मचारी तुमच्याशी फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतील, तर तुम्ही त्यांची तक्रार करू शकता. भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर तक्रार नोंदवण्यासाठी 1800-22-4344 या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करा. एचपी पेट्रोल पंपाच्या तक्रारीसाठी टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक 1800-2333-555 वर कॉल करा. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या पेट्रोल पंपासाठी 1800-2333-555 वर कॉल करा. याशिवाय, तुम्ही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर (https://pgportal.gov.in/) जाऊन तक्रार दाखल करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT