Petrol Diesel Rate  Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate : पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये बदल, मुंबई-पुण्यात १ लिटरसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Petrol Diesel Rate 2nd August 2024: राज्यात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून बदल झालेला नाही. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर.

Siddhi Hande

देशात रोज इंधनाचे नवे दर जाहीर होत असतात. देशभरात घरातील एका व्यक्तीकडे तरी एक वाहन आहे. रोज अनेक लोक ऑफिसला जाण्यासाठी, बाहेर जाण्यासाठी खाजगी वाहनाचा वापर करतात. परंतु आता वाहनाचा वापर करणे महागले आहे. याचे कारण म्हणजे पेट्रोल डिझेलचे वाढते दर. पेट्रोल डिझेलचे दर गेल्या कित्येक दिवसांपासून शंभरीपार आहेत. त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला फटका बसत आहे.पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतील, अशी आशा सर्वसामान्य नागरिकांना होती. मात्र, गेल्या कित्येक दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत.

देशातील महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे दर

आज नवी दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेल ८७.६२ रुपये आहे.मुंबईत पेट्रोल १०३.४४ रुपयांवर विकले जात आहे तर डिझेल ८९.९७ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे.कोलकत्त्यात पेट्रोल १०४.९५ रुपयांवर विकले जात आहे तर डिझेलचे दर ९१.७६ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे. चेन्नईत पेट्रोल १००.७५ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेल ९२.३४ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचे दर

पुण्यात पेट्रोलची किंमत १०३.८९ रुपये प्रति लिटर आहे. काल हे दर १०३.७६ रुपये प्रति लिटर होते. तर डिझेलची किंमत ९०.४३ रुपये आहे.ठाण्यात पेट्रोल १०३.७४ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेल ९०.२५ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे. नाशिकमध्ये पेट्रोल १०४.९१ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९१.४१ रुपये आहे.नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत १०३.९८ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.५४ रुपये आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.८२ रुपये आहे. तर डिझेलची किंमत ९१.३६ रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart blockage: हार्ट ब्लॉकेज असल्यास शरीरात दिसतात हे ६ मोठे बदल

मेट्रो अधिकाऱ्याच्या कृत्याने मुंबई हादरली; इंजिनीअर असलेल्या महिलेवर ऑफिसमध्येच अत्याचार

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

SCROLL FOR NEXT